Mumbai Crime: ठाण्यातील शहापूरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहापूरात एका ज्वेलर्सच्या दुकानासमोरच सेल्समनवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात सेल्समनचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.शहापूर शहरालगत गोठेघर हद्दीतील पंडीतनाका येथील महालक्ष्मी ज्वेलर्सच्या दुकानासमोर शनिवारी रात्री साडेदहा वाजता गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दुकानाचे कामगार आणि सेल्समन दिनेश चौधरी हे गंभीरपणे जखमी झाले.दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान चौधरीचा मृत्यू झाला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,चौधरी दुकान बंद करून बाहेर पडत असताना एका दुचाकीवरून आलेल्या दोघा इसमांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर ते दोन आरोपी घटनास्थळावरून एक बॅग घेऊन फरार झाले. पोलिसांनी बॅगची तपासणी केली असता, त्यात फक्त कागदपत्रे आढळली. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, गोळीबार चोरीच्या उद्देशाने झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. पोलीस अन्य संभाव्य कारणांचा तपास करत आहेत.


व्यापारीवर्गात भीतीचे वातावरण


या घटनेमुळे शहापुरात खळबळ उडाली असून, पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे आणि पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली आहे. श्वानपथकाच्या मदतीने घटनास्थळाची झाडाझडती घेतली जात आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली असून, आरोपींचा शोध सुरू आहे. चौधरी यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले, परंतु त्यांना ठाणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आणि उपचारादरम्यान पहाटे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने शहापूरमधील व्यापारवर्ग आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी तपासाची प्रक्रिया सुरू केली असून, आरोपींच्या शोधासाठी त्यांच्या ताब्यात असणाऱ्या ठिकाणी शोध घेत आहेत. 


मस्साजोग हत्याप्रकरण तापले


बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले असताना या प्रकरणाबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता कारवाईला वेग आला असून हे हत्या प्रकरण हाताळण्यासाठी राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भूमिकेनंतर आता या प्रकरणाच्या घडामोडींना वेग आला आहे. राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिल म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सद्यस्थितीत कोल्हे वकिल म्हणून काम पाहणार असल्याची माहिती पुढे आली आहे.   


हेही वाचा:


सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारवाईला वेग; राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलांची नेमणूक