Mumbai Crime Police Updates : ड्रग्जचा पुरवठा आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासह बारमधील बेकायदेशीरता, जुगार खेळणारे आणि फेरीवाल्यांकडून त्यांना संरक्षण देण्याच्या बहाण्याने पैसे उकळणाऱ्या लोकांवर कारवाई करा, असे मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत सांगितले.
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मंगळवारी गुन्हे शाखेच्या सह पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, सर्व डीसीपी गुन्हे आणि गुन्हे शाखेच्या सर्व पोलीस निरीक्षकांची आढावा बैठक घेतली.
पांडे म्हणाले की, मुंबई गुन्हे शाखेचा खंडणी विरोधी कक्ष केवळ अंडरवर्ल्डच्या खंडणीच्या प्रकरणांवरच कारवाई का करतो. स्थानिक फेरीवाले आणि सामान्य माणसाचे काय, ज्यांना दररोज पैसे उकळून त्रास दिला जातो. त्यांच्यावर कारवाई सुरू करा, असं पांडे यांनी सांगितलं आहे.
त्यांनी म्हटलं की, अंमली पदार्थ विरोधी सेलला शहरातील प्रत्येक अमली पदार्थ तस्करांवर कारवाई करण्यास सांगितले. केवळ मोठ्या प्रकरणांवरच नाही. त्याचप्रमाणे, सर्व 12 गुन्हे शाखेच्या युनिट्सना अंमली पदार्थांची तस्करी, बारमधील बेकायदेशीरता आणि जुगाराची प्रकरणे करण्यास सांगितले होते.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची बैठक दुपारी अडीच वाजता सुरू झाली आणि दुपारी 4 वाजेपर्यंत चालली. पांडे यांनी प्रत्येक वरिष्ठ पोलिस निरीक्षकांशी बोलून त्यांना त्यांनी केलेल्या कामाबद्दल विचारले आणि शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कारवाई करण्यास सांगितले.
ते म्हणाले, गुन्हे शाखा हे विशेष तपास पथक आहे. त्यांनी बेकायदेशीर आणि समाजविघातक कारवायांवर बारीक लक्ष ठेवून त्यानुसार कारवाई सुरू करावी.
पांडे यांच्या सूचनेनंतर आता अधिकारी कारवाई सुरू करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दर आठवड्याला अशी आढावा बैठक घेतली जाईल असे गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -
महत्वाच्या बातम्या
- Pune News : मुलीला कुत्रा चावला म्हणून तिच्या दोन पिल्लांना ठार केलं; पुण्यातील महिलेचे कृत्य
- धक्कादायक! मटणाची भाजी का बनवली नाही? पत्नीला मारहाण, पतीविरोधात गुन्हा
- दीड महिन्यात सात मुलांशी थाटला संसार; किल्ल्यावरून पत्नी पळून गेल्यानंतर सातव्या पतीला कळलं धक्कादायक सत्य