Mumbai Crime News : डोंबिवलीत (Dombivli ) एक धक्कादायक घटना घडलीय. सिगारेट आणून दिली नाही म्हणून एकाने आपल्याच मित्राची हत्या केलीय. जयेश जाधव असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर, हरीश्चंद्र उर्फ बकूळ चौधरी असे संशयित आरोपीचे नाव आहे. चौधरी याला पोलिसांनी अटक केलीय.
चौधरी याने भिंतीवर डोके आटपून जयश याची हत्या केली आहे. जयेशच्या हत्येप्रकरणी चौधरी याला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने 15 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या मारहाणीचे सीसीटिव्ही फुटेज समोर आलं आहे. बकूळ याने प्रथम जयश याला हाताने मारहाण केली आणि त्यानंतर त्याचे डोके भिंतीवर आदळले. भिंतीवर डोके आदळल्यानंतर जयश जमिनीवर कोसळला. तरी देखील त्याला मारहणा करण्यात आली. जयश याची हालचाल बंद झाल्याचे कळताच बकूळ याने आपल्या साथीदारासोबत घटनास्थळाहून पळ काढल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. दरम्यान, या घटनेमुळे डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे.
डोंबिवलीतील पेंडसेनगर येथे राहणारा जयेश जाधव आणि डोंबिवली पूर्व भागातील ठाकूर्ली परिसरात राहणार बकूळ चौधरी हे दोघे मित्र होते. 4 नोव्हेंबर रोजी दुपारी दोघे दारु पिण्यासाठी बसले होते. दारू पिल्यानंतर दोघेही त्याठिकाणीहून घरी येण्यासाठी निघाले होते. डोंबिवली पूर्व भागातील पेंडसे नगरमधील एका इमारतीच्या गेटवर आल्यानंतर बकूळ याने जयेशला सिगारेट घेऊन ये असे सांगितले. त्यासाठी त्याने पैसे दिले होते. परंतु, जयेशने सिगारेट आणली नाही. त्यामुळे बकूळ खूपच संतापला, त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादात बकूळ याने जयेशला बुक्क्यांनी मारहाण केली. त्याचे डोके भिंतीवर आपटले. या मारहाणीत जयेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला मुंबईतील शीव रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र प्रकृती खालावल्यामुळे उपचार सुरू असताना जयेशचा मृत्यू झाला.
जयशच्या मृत्यूनंतर डोंबिवली रामनगर पोलिसांनी बकूळच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. पोलिसांनी बकूळ याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 15 नाव्हेंबर्पयत पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती डोंबिवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली आहे. डोंबिवली रामनगर पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या