Mumbai Crime News : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) 170 गुंतवणूकदारांची सुमारे 7 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी एका गुंतवणूक फर्मच्या मालकाला अटक केली आहे. आरोपीनं ज्ञात अंकशास्त्रज्ञ आणि वास्तु सल्लागार बिंदू खुराना यांच्या नावाचा आणि प्रतिष्ठेचा गैरवापर केला आणि ग्राहकांना आकर्षक परताव्याच्या आश्वासनाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केलं.


आरोपी सिद्धार्थ पिलानी (36) हा कांदिवली (पश्चिम) येथे कार्यालय असलेल्या कॅपिटल बर्गचा मालक आहे. अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स (MPID) कक्षाने पिलानीला अटक केल्याची पुष्टी EOW च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने केली. बिंदू खुराना यांचा मुलगा चित्करण खुरानानं पोलिसांकडे तक्रार केली. खुराना कुटुंबाला पिलानीनं सांगितले की, ऑफ-मार्केट व्यवहार आणि स्टॉक मार्केटिंग हे खात्रीशीर आणि विश्वासार्ह परताव्यासह गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि वास्तविक व्यासपीठ आहेत. त्याच्यावर विश्वास ठेवून खुराना यांनी सुरुवातीला पैसे गुंतवले. पिलानीनं सुरुवातीच्या महिन्यांत परतावा देण्याचे वचन दिले.


पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीनं बिंदू खुराना यांना एक झूम मिटिंग आयोजित करण्यास सांगितली, ज्यात 30 लोक उपस्थित होते. बैठकीत पिलानीनं सहभागींना खात्रीशीर गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास पटवून दिले. आरोपींनी सुमारे 170 गुंतवणूकदारांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून त्यांची फसवणूक केली.
 
भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 406, 409 आणि 34 आणि एमपीआयडी कायद्याच्या कलम 3 आणि 4 अंतर्गत पिलानीला अटक करण्यात आली. सोमवारी न्यायालयाने त्यांला न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणात त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. पिलानीवर 2019 मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता ज्यामध्ये त्यांच्यावर 13 गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.


हेही वाचा: