मुंबई : मंदिरातच पुजाऱ्याकडून अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील गोरेगावच्या जवाहरनगर येथील ही घटना समोर आली आहे. गोरेगावच्या गावदेवी मंदिरात पीडित पाच वर्षीय मुलीसोबत मंदिराच्या पुजाऱ्यानेच अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न करण्याच्या धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. मंदिरातच अल्पवयीन मुलीसोबत असा प्रकार घडल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्नांवर पुन्हा एकदा समोर आला आहे.


मंदिरातच पुजाऱ्याकडून अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न


गोरेगावच्या गावदेवी मंदिरात 12 जून रोजी ही घटा घडल्याची माहिती समोर आली आहे. पीडित 5 वर्षीय मुलगी 12 जून रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास देवदर्शनासाठी आली असताना पुजाऱ्याने आक्षेपार्ह वर्तन केलं. प्रसाद देण्याच्या नावाखाली मंदिरातील पुजारीने तिला मंदिराच्या मागील बाजूस नेत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, पुजाऱ्याने अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला, मात्र वेळीच मुलीच्या जवळच्या व्यक्तीच्या ही बाब लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. 


नराधम पुजारी पोलिसांच्या अटकेत


या प्रकरणी मुलीच्या कुटुंबियाने दिलेल्या तक्रारीनुसार, गोरेगाव पोलिसांनी आरोपी पुजारी शिवम पांडेच्या विरोधात कलम 354 (अ), भादवीसह 12 पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपी पुजारी शिवम पांडे याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, मंदिरातील पुजाऱ्याकडूनच अशाप्रकारचं अश्लील कृत्य करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता मंदिरातही मुली सुरक्षित नसल्याचं समोर आलं असून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Crime News : छोट्या भावानं केलं वहिनीसोबत लग्न, नाराज भावांनी सख्ख्या भावालाच संपवलं; धक्कादायक घटनेने खळबळ