Mumbai Crime News: मुंबईत एका अल्पवयीन मुलीचे अपहरण (Mumbai Crime News) करून मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर बलात्कार केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. मुंबईतील वडाळा भागातून या मुलीचे अपहरण (Minor Girl Kidnapping ) करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल वीरकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी 5 सप्टेंबर रोजी कॉलेजमध्ये जाण्यासाठी निघाली होती. वडाळा येथील राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेजवळ पीडित मुलगी पोहचली असताना आरोपीने तिचे अपहरण केले. आरोपी विशाल वीरकरने पीडितेला बोलेरो कारमध्ये जबरदस्तीने बसवले आणि तिला पुणे एक्स्प्रेस वे च्या दिशेने नेले. एक्स्प्रेस वे लगतच्या एका अज्ञात ठिकाणी तिच्यावर अत्याचार करण्यात आला.


पीडित महिलेच्या तक्रारीनंतर कळंबोली पोलीस ठाण्यात या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण माटुंगा पोलिसांकडे सोपवण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी विशाल वीरकरविरोधात भारतीय दंड संहितेनुसार, कलम 363, 376, 323 आणि 506, पोस्को कायद्यातील कलम 4,8 आणि 6 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. 


पुण्यात 13 वर्षीय अपंग मुलीवर लैंगिक अत्याचार


इंदापूर तालुक्यातील (Inapur) गावात सहावीत शिकणाऱ्या 13 वर्षीय दिव्यांग मुलीवर वारंवार लैंगिक (rape) अत्याचार झाल्याची घृणास्पद घटना उघडकीस आली आहे. अत्याचार झाल्यानंतर ती मुलगी गरोदर झाल्याचं समोर आलं असून या प्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात एका महिलेचा आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. यातील महिला आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. 


अनिल नलावडे,  नाना बगाडे आणि शुभांगी कुचेकर या प्रकरणातील आरोपींची नावे आहे. अनिल नलावडे याने वारंवार या मुलीवर बलात्कार केल्याची फिर्याद या मुलीच्या आईने दिल्यानंतर पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. नोव्हेंबर 2021 ते एप्रिल 2022 या कालावधीत वारंवार पीडितेवर बलात्कार करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.