मुंबई माटुंग्यातील (Matunga)  म्हैसूर कॅफेच्या (Mysore Cafe) व्यावसायिकांला गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे सांगून लुबाडणाऱ्यांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चोरीत आजी माजी पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याने अनेकांच्या भूवया उंचवल्या आहेत.  सहा आरोपींनी घरात निवडणुकीसाठी काळा पैसा असल्याचे सांगत घरातून 25 लाखाची रोकडं लंपास केली .  या प्रकरणी सायन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत पोलिसांनी सहा जणांना  अटक केली आहे. 


 पोलिसांनी दिलेल्या माहितीनसार 'स्पेशल 26' या चित्रपटाप्रमाणेच आरोपींनी  कट रचला होता.  बाबासाहेब भागवत (50), दिनकर साळवे (60),वसंत नाईक (52), शाम गायकवाड (52),नीरज खंडागळे (35) आणि सागर रेडेकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या टोळीत आणखी काही सेवानिवृत्त पोलिसांचा सहभाग असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. न्यायालयाने आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी  दिली आहे. 


'स्पेशल  26'  चित्रपट पाहच रचला कट


'स्पेशल  26'  चित्रपटात दाखवलेल्या एका सीनप्रमाणे आरोपींनी निवडणुकीच्या काळात चोरीचा कट रचला होता. यातील वंसत नाईक हा मुख्य आरोपी असून वर्षभरापूर्वी त्याला म्हैसूर कॅफेतून काढले होते. मालकाच्या अंत्यत जवळचा व्यक्ती असल्याने मालकाच्या घरात दररोज येणाऱ्या पैशांची माहिती त्याला होती. मालकाने  कामावरुन काढल्याचा राग  त्याच्या मनात होता. हाच राग मनात ठेवत आरोपीने लुटीचा कट रचला होता. म्हैसूर कॅफेच्या मालकाच्या घरी रक्कम ठेवलेली असते हे आरोपी वसंत नाईकाला माहित होते. त्याने मालकाला आपल्या डोक्यात सुरू असलेली लुटीची योजना सांगितले. साथीदारांना देखील हा कट आवडला त्यांनी देखील  तयारी दाखवली.


काळा पैसा घरात असल्याचे सांगत टाकली धा


म्हैसूर कॅफेच्या मालकाच्या घरी मोठी रक्कम असेल त्या दिवशी अधिकारी बनून जायचे आणि लूट करण्याचा बेत आखण्यात आला. दरम्यान कॅफे म्हैसूर मालकाच्या घरी 20 कोटींची रोकड असल्याची माहिती मिळाली. सोमवारी 13 मे रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास एक बनावट पोलीस व्हॅन आणि खाजगी कारमधून कॅफेच्या मालकाच्या घरी पोहचले. बनावट पोलीस ओळखपत्र दाखवत आम्ही क्राईम ब्रांन्चचे अधिकारी आहे. तुमच्या घरात निवडणुकीची रोकड असल्याची टीप मिळाली आहे, असे बोलून घराची झडती घेऊन कपाटातील  25 लाख रुपयाची रोकड दाखवत गुन्हा दाखल करण्याची  धमकी दिली. गुन्हा दाखल न करण्याच्या अटीवर  25 लाख रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. 


हे ही वाचा :


आयकर अधिकारी बनवून केली 20 लाखांची फसवणूक, माटुंगा पोलिसांनी तिघांना केली अटक