Mohini Ekadashi 2024 : एकादशी तिथीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. सर्व एकादशीच्या तारखा या भगवान विष्णूला समर्पित आहेत आणि त्यापैकी काही एकादशी (Ekadashi) या विशेष मानल्या जातात. वैशाख महिन्यातील एकादशीचाही यात समावेश आहे. मे महिना सुरु झाला आहे आणि या महिन्यात येणारी दुसरी एकादशी म्हणजे वैशाख शुक्ल एकादशी, अर्थात तिला मोहिनी एकादशी (Mohini Ekadashi) असंही म्हणतात.


ही एकादशी अतिशय विशेष आहे कारण समुद्रमंथनाच्या वेळी अमृत बाहेर पडले तेव्हा भगवान विष्णूंनी राक्षसांपासून वाचवण्यासाठी मोहिनीचे रूप धारण केले. या रूपात भगवान विष्णूने सर्व देवांना अमृत प्यायला फसवले. वैशाख शुक्ल एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले होते, म्हणून या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. या वर्षी मोहिनी एकादशी नेमकी 18 की 19 तारखेला आहे ते जाणून घेऊयात. 


मोहिनी एकादशी 2024 (Mohini Ekadashi 2024)


पंचांगानुसार, वैशाख शुक्ल एकादशी किंवा मोहिनी एकादशी 18 मे रोजी सकाळी 11:22 वाजता सुरू होईल आणि 19 मे रोजी दुपारी 1:50 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार 19 मे ही मोहिनी एकादशी मानली जाईल. 19 मे रोजी मोहिनी एकादशीचे व्रत आणि पूजा करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 20 मे रोजी द्वादशी तिथी साजरी केली जाईल. मोहिनी एकादशी व्रताची पारण वेळ 20 मे रोजी सकाळी 05:28 ते 08:12 पर्यंत असेल. 


मोहिनी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि काय करू नये?


मोहिनी एकादशीचा दिवस हा अत्यंत पवित्र दिवस आहे. या दिवशी उपवास केला नसला तरी भाताचे सेवन करू नये. एकादशीच्या दिवशी भात खाण्यास मनाई आहे. याशिवाय मांसाहारी पदार्थ, मदयपान पिण्याची चूक करू नका. एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करू नका किंवा स्पर्श करू नका. एकादशीच्या दिवशी विष्णूप्रिया तुळशीचा उपवास करते, पाणी अर्पण करून आणि तुळशीची पाने तोडून तिचे व्रत मोडले जाते. यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्रोधित होऊ शकतात ज्यामुळे तुमच्या जीवनात दारिद्र्य, दुःख येण्याची शक्यता असते. तसेच एकादशीच्या व्रतामध्ये झोपू नये. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Mohini Ekadashi 2024 : मोहिनी एकादशीला जुळून आले दुर्मिळ योग; 'या' राशींची होणार लखलखाट, नोकरी-व्यवसायासह सर्वत्र मिळणार लाभ