Mumbai Crime: राज्यात बदलापूरच्या घटनेला लाजवणारी घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. विशाल गवळी या नराधमाने 13 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. मुलीची हत्या करून भिवंडी तालुक्यातील बापगाव परिसरात मृतदेह फेकून दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस वेगवेगळी पथकं तयार करून मुलीचा शोध घेत होते .मात्र मंगळवारी सकाळी बापगाव परिसरात एक अज्ञात अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली .
कल्याण कोळसेवाडी पोलीस मुलीच्या वडिलांना घेऊन घटनास्थळी दाखल झाली . त्यावेळी वडिलांनी मृतदेह मिळाला आणि पोलिसांनी वेगवेगळे पोलीस पथक तयार करून घटनेचा तपास सुरू केला . या
तपासादरम्यान कल्याण पूर्वेतील विकृत नराधम विशाल गवळी याचे नाव समोर आले आहे .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल गवळी या नाराधमाला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणारा रिक्षा चालकाला अटक केली आहे .
क्लासवरून घरी जाणाऱ्या मुलीवर भररत्यात अतिप्रसंगाचा प्रयत्न
विशाल गवळी हा बदलापूरच्या अक्षय शिंदेपेक्षाही वरचढ विकृत असल्याचे समोर आले आहे . विशाल याचे आत्तापर्यंत तीन लग्न झाले आहेत . त्याच्या दोन बायका त्याला सोडून गेल्या आहेत . तिसरी बायको एका खाजगी बँकेत नोकरीला आहे . या विकृताने क्लासवरून घरी जाणाऱ्या एका मुलीवर भररस्त्यात तिला खाली पाडून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता . विशाल या विकृतावर आत्तापर्यंत बलात्कार करणे ,बलात्काराचा प्रयत्न करणे ,छेडछाड करणे ,लहान मुलांचे लैगिंक शोषण करणे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गुन्ह्याची नोंद आहे . कल्याण पूर्व परिसरात त्याची दहशत आहे . त्याच्या दहशतीमुळे काही कुटुंब परिसर सोडून निघून गेले आहेत .
आरोपीला राजकीय वलय?
धक्कादायक बाब म्हणजे विशाल गवळी या विकृताला राजकीय वलय असल्याची माहिती समोर आली आहे . या विकृताने केलेल्या गुन्ह्यांमध्ये फिर्यादींना दमदाटी करून तेच मागे घेण्यास लावणे इत्यादी प्रयत्न करत असल्याची चर्चा कल्याण पूर्ववत रंगली आहे . त्यामुळे या विकृताला नेमका कोणाचा आशीर्वाद हे शोधून काढण्याची मागणी करण्यात येत आहे.कल्याण येथील तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा अपहरण करून हत्या करणारा आरोपी विशाल गवळी हा शेगावमध्ये असल्याची माहिती शेगाव पोलिसांना सकाळी मिळाली. यावरून शेगाव पोलिसांनी सापळा रचत शेगाव शहरातील शिवाजी चौकातील एका सलून मधून शेविंग करत असताना विशाल गवळीला ताब्यात घेतलं अर्ध्या तासापूर्वीच ही कारवाई करण्यात आली आहे. सध्या विशाल गवळी याला शेगाव पोलीस स्थानकात ठेवण्यात आलं आहे.
या नराधमांना कायदेशीर कारवाई करून जे कोणी राजकीय या विक्रोताला पाठीशी घालतात त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्याची मागणी स्थानिक नागरिकांसह महेश गायकवाड यांनी केली आहे . महेश यांनी कल्याण पूर्व येथील काही नागरिकांसमवेत या घटनेचा निषेध करत तोंडाला काळी पट्टी बांधून मूक मोर्चा काढला आहे.