Mumbai Crime: मुंबईतील चिराबाजारमधील एका प्रकरणाने खळबळ उडाली असून व्यावसायिक वादातून केलेला हत्येचा कट व्यवसायिकाच्याच अंगाशी आल्याचा प्रकार घडलाय. (Mumbai Crime) महिन्याभरापूर्वी अपघाताचा गुन्हा दाखल झालेल्या या प्रकरणात एक नवाच ट्वीस्ट आला असून हा अपघात नसून हत्येचा कट असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. वर्षभरापूर्वी झालेल्या अपघातानंतर या प्रकरणातील धागेदोरे समोर आले असून गुन्हे शाखेच्या तपासात हा अपघात हत्येचा कट रचल्या प्रकरणी आता दोन्ही आरोपीवर एलटी मार्गमधील दाखल अपघाताच्या गुन्ह्यातील कलमात हत्येचा प्रयत्न या कलमाची वाढ केली आहे.
नक्की प्रकरण काय?
चिराबाजारमधील व्यापारी किरणराज शाह (67) यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी दुकानात पिस्तूल ठेवल्याच्या प्रकरणात गुन्हे शाखा कक्ष-9 च्या पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. निरंजन गुप्ता (35) आणि त्याचा साथीदार केतन पारेख (40) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशीदरम्यान, या प्रकरणाशी संबंधित धक्कादायक माहिती समोर आली आहे. वर्षभरापूर्वी शाह यांचा झालेला अपघात हा अपघात नसून, हत्येचा कट असल्याचे उघड झाले आहे. तपासात आरोपींनी हा कट रचल्याचे स्पष्ट झाले आहे.
11 नोव्हेंबर 2023 रोजी या आरोपींनी किरणराज शाह यांचा अपघात घडवला होता. याप्रकरणी एल.टी. मार्ग पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, गुन्हे शाखेच्या तपासादरम्यान हा अपघात हत्येचा प्रयत्न असल्याचे उघड झाले. त्यामुळे एल.टी. मार्ग पोलीस ठाण्यात दाखल अपघाताच्या गुन्ह्यात हत्येचा प्रयत्न या कलमाची वाढ करण्यात आली आहे.
मोबाईल तपासात धक्कादायक पुरावे
या गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली असून, आरोपींचे मोबाईलही ताब्यात घेण्यात आले आहेत. मोबाईल तपासादरम्यान अपघाताबाबत आरोपींनी एकमेकांशी केलेल्या संभाषणाचे पुरावे मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गुन्हे शाखा कक्ष-9 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात आला. तपासादरम्यान आरोपींचा कट उघड झाल्याने व्यावसायिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा: