Crime News Malad : मालाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचे अपहरण करुन 6 लाख रुपये लुटलाचा प्रकार घडला आहे. अभय सिंग (वय, 25 वर्ष) असे अपहरण करुन लूट केलेल्या तरुणाचे नाव आहे.
कॉल सेंटरमध्ये काम करणारे अभय सिंग यांचे दोन आरोपींनी अपहरण करत त्यांना गोरेगावमधील एका निर्माणधीन इमारतीमध्ये ठेवले होते. त्यानंतर त्याच्या अकाउंटमधून ऑनलाईन 6 लाख रुपये काढले. त्यानंतर त्याचा नग्न व्हिडिओ बनवला. पोलिसात तक्रार केली तर हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देखील दिली होती. याप्रकरणी फिर्यादीचा तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना बेड्या ठोकला आहे. एंजेल गोम्स वय 25 वर्ष आणि आदित्य बडेकर वय 21 वर्ष अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.
आरोपी एंजेल गोम्स हा फिर्यादीसोबत कॉल सेंटरमध्ये पूर्वी कामाला होता
अटक करण्यात आलेले आरोपी एंजेल गोम्स हा फिर्यादीसोबत कॉल सेंटरमध्ये पूर्वी कामाला होता. फिर्यादीसोबत कॉल सेंटरमध्ये भांडण केल्यामुळं फिर्यादीने कॉल सेंटर मॅनेजरला तक्रार केली होती. या तक्रारीमुळं आरोपी एंजेल गोम्स याला कॉल सेंटरमधून काढून टाकले होते. याचाच राग धरुन आरोपीने आपल्या मित्रासोबत मिळून फिर्यादीला अपहरण करून त्याच्याकडून सहा लाख रुपये लुटले होते. फिर्यादीच्या तक्रारीवरुन अपहरण करणाऱ्या दोन्ही आरोपींना मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींनी यापूर्वी अशा स्वरुपाचे गुन्हे मुंबई शहरात केले आहेत का? यामध्ये आणखी कोणी यांचे साथीदार आहेत का? याचा अधिक तपास मालवणी पोलीस करत आहेत.
अलिकडच्या काळात अपहरण करुन लुटमार करण्याच्या घटनांमध्ये वाढ
दरम्यान, अलिकडच्या काळात अपहरण करुन लुटमार करण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन देखील सतर्क झालं आहे. आरोपीअपहरण करुन ऑनलाईन पद्धतीने धमकी देऊन पैशांची लूट करत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशातच मालाडमध्ये देखील अशीच धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान, या प्रकरणामुळं पोलिस प्रशासन अधिक सतर्क झालं आहे. दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अधिकचा तपास पोलीस प्रशासन करत आहे.
महत्वाच्या बातम्या: