एक्स्प्लोर

जुना वाद उफाळला, चाकू कोयते घेऊन एकमेकांच्या अंगावर धावून गेले, 3 जण जागेवरच संपले, 4 गंभीर, दहीसरमध्ये थरार

Mumbai Crime: नारळ स्टॉलवर उभे असताना झालेल्या या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. हल्ले करणारे आरोपी जखमी असल्यामुळे पोलिसांकडून आरोपीला अटक करणे बाकी आहे.

Mumbai Crime: मुंबईच्या दहिसर पश्चिम गणपत पाटील नगर परिसरात रविवारी संध्याकाळी जुन्या वादातून झालेल्या हल्ल्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन परिवारांमधील जूना वाद टोकाला गेला. जुन्या वादातून झालेल्या तुफान हाणामारीत शेख आणि गुप्ता कुटुंबियांनी एकमेकांवर कोयता, चाकूने हल्ला चढवला. यात तीनजण जागीच संपले असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती.  (Murder Case)

ही घटना सोमवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास घडली. गणपत पाटील नगरच्या गल्ली क्रमांक 14 समोर गुप्ता कुटुंबाचा नारळ विक्रीचा स्टॉल आहे. या स्टॉलवर उभा असलेल्या गुप्ता कुटुंबावर शेख कुटुंबीयांनी अचानक चाकू आणि कोयत्याने हल्ला केला. या हाणामारीत गुप्ता कुटुंबातील राम नवल गुप्ता (वडील) आणि अरविंद गुप्ता यांचा जागीच मृत्यू झाला, तर अमर गुप्ता आणि अमित गुप्ता हे गंभीर जखमी झाले आहेत. नारळ स्टॉलवर उभे असताना झालेल्या या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

नक्की घडले काय?

मुंबईतील दहीसरमध्ये गणपत पाटील नगरच्या गल्ली क्रमांक 14 समोर गुप्ता कुटुंबाचा नारळ विक्रीचा स्टॉल आहे. काल संध्याकाळी 4:30 च्या सुमारास चाकू आणि कोयता घेऊन शेख आणि गुप्ता  कुटुंब एकमेकांवर हल्ला केला. जुन्या वादातून झालेल्या या हल्ल्यात यात तीन जणांचा जागेवरच मृत्यू झाली तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमीवर जवळच्या भगवती रुग्णालयमध्ये उपचार सुरू आहे. M.H.B पोलिसांनी रात्री उशिरा दोन्ही कुटुंबीयांचा विरोधात क्रॉस हत्येचा गुन्हा दाखल केले आहे. हल्ले करणारे आरोपी जखमी असल्यामुळे पोलिसांकडून आरोपीला अटक करणे बाकी आहे.

जुन्या वादातून चाकू अन् कोयत्याने हल्ला

शेख आणि गुप्ता या दोन्ही कुटुंबीयांचा 2022 मध्ये वाद झाला होता यानंतर दोघांविरोधात एम एच बी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता.गणपत पाटील नगर गल्ली नंबर 14 च्या समोर गुप्ता याच्या नारळ विक्री स्टॉलवर काल संध्याकाळी उभा असताना शेख कुटुंबीयांकडून चाकू आणि कोयताने हल्ला करण्यात आला.

पोलीसांचा तपास सुरु

या मारामारी मध्ये राम नवल गुप्ता(वडील) व अरविंद गुप्ता हे मृत झाले असून अमर गुप्ता व अमित गुप्ता जखमी आहेत. तसेच दुसराबाजूला हमीद शेख (वडील) हा सुद्धा मृत झाला असून त्याचा मुलगा अरमान शेख व हसन शेख जखमी आहे.याप्रकरणी एम एच बी पोलिसांनी परिसरात असलेली सीसीटीव्ही आणि इतर पुरावा गोळा करून रात्री उशिरा हत्येचा गुन्हा दाखल करत पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा:

Ratnagiri Jagbudi River Accident: मीरा-भाईंदरचे पराडकर-मोरे कुटुंबीय अंत्यविधीसाठी कोकणात जाताना घात झाला, जगबुडी नदीच्या पुलावर आक्रित घडलं

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget