IPL Schedule 2025 : आयपीएलच्या 18व्या हंगामाचे म्हणजेच आयपीएल 2025 चं वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यावेळी आयपीएल चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फायनलनंतर 12 दिवसांनी सुरू होत आहे. यंदाचा आयपीएलचा हंगाम 22 मार्च ते 25 मे दरम्यान खेळवला जाणार आहे.  यावेळी आयपीएलचा  पहिला सामना 22 मार्च रोजी KKR विरुद्ध RCB असा पाहायला मिळणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्डनवर स्टेडियमवर हा सामना होणार आहे. यावेळी एकूण 74 सामने 13 वेगवेगळ्या ठिकाणी खेळवले जाणार आहेत.

आयपीएल 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर

22 मार्चपासून रंगणार आयपीएलचा महासंग्राम

ईडन गार्डन्सवर कोलकाता वि. बंगलोर सलामीचा सामना

25 मेला ईडन गार्डन्सवरच आयपीएल फायनल

23 मार्चला मुंबई वि. चेन्नई हायव्होल्टेज लढत

5 वेळचा चॅम्पियन ठरलेला चेन्नई सुपर किंग्सचा संघ सलग दुसऱ्या हंगामात  ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळताना पाहायला मिळणार आहे.  ऋतुराज गायकवाडचा कर्णधार म्हणून त्याचा दुसरा हंगाम असेल.  हंगामात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आपला पहिला सामना 23 मार्च रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे. सीएसकेच्या चाहत्यांसाठी हा खास सीझन असेल कारण कदाचित एमएस धोनीचा शेवटचा सीझन असेल. 

चेन्नई आणि मुंबई कधी भिडणार? 

IPL 2025 चा सर्वात मोठा सामना 23 मार्च रोजी होणार आहे. या दिवशी आयपीएलमधील दोन सर्वात मोठे संघ भिडणार आहेत. 23 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. यंदाच्या मोसमात दोन्ही संघांमध्ये दोन लढती होतील.

13 शहरांमध्ये खेळवले जातील आयपीएलचे सामने 

आयपीएलच्या 18 व्या हंगामातील सामने एकूण 13 शहरांमध्ये खेळवले जातील. आयपीएल 2025 चे सामने लखनौ, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, विशाखापट्टणम, गुवाहाटी, बेंगळुरू, न्यू चंदीगड, जयपूर, दिल्ली, कोलकाता आणि धर्मशाला येथे खेळवले जातील. IPL 2025 मध्ये एकूण 12 डबल हेडर सामने आहेत. म्हणजेच प्रत्येकी दोन सामने दिवसातून 12 वेळा खेळवले जातील.

दरवर्षी आयपीएलचा पहिला सामना गेल्या मोसमात फायनल खेळणाऱ्या दोन संघांमध्ये व्हायचा, पण यंदा तो होताना दिसत नाही. मागील हंगामाच्या म्हणजेच IPL 2024 च्या फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला होत. परंतु IPL 2025 चा पहिला सामना KKR आणि RCB यांच्यात होणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

DC W vs MI W WPL 2025: 1 चेंडू अन् विजयासाठी 2 धावांची गरज; मुंबई अन् दिल्लीच्या सामन्यात शेवटच्या चेंडूत काय घडलं?, VIDEO