मुंबई : मुंबईच्या (Mumbai) सायन पोलीस स्टेशनच्या (Sion Police Station) हद्दीत कॅफे म्हैसूरच्या (Cafe Mysore Hotel) मालकाला 'खाकी'चा धाक दाखवून लुटले होते. या प्रकरणात सायन पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. दोन पोलिसांसह 9 आरोपींना सायन पोलिसांकडून अटक (Two Accuse Arrested) करण्यात आली होती. मात्र, दोन मुख्य आरोपी फरार होते, त्यांना देखील सायन पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. लोकसभा निवडणुकीत पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचं सांगत एका हॉटेल व्यावसायिकाच्या घरात घूसून 25 लाखांची रोकड लुटल्याची घटना मुंबईच्या सायन येथे घडली होती. 


मुंबईतील कॅफे मालकाला 'खाकी'चा धाक दाखवून लुटलं


मुंबईत दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारानं सर्वत्र खळबळ माजली होती. आरोपी मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचं सांगत त्यांनी आपली ओळखपत्र हॉटेल मालक नरेश यांना दाखवली. तुमच्या फ्लॅटमध्ये 17 कोटी रुपयांचा काळा पैसा ठेवला असून तो लोकसभा निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे, अशी आम्हाला माहिती मिळाल्याचं संबंधित व्यक्तींनी नरेश यांना सांगितलं. नरेश यांनी आपल्याकडे एवढी मोठी रक्कम असल्याचं नाकारलं.


हॉटेल मालकाचे 25 लाख रुपये लंपास


त्यानंतर या आरोपींनी हॉटेल मालकाच्या घरी सर्च करून 25 लाख रुपये रोकड घेऊन फरार झाले होते. हॉटेल मालकाचा तक्रारी नंतर सायन पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन पोलीस कर्मचाऱ्यासह नऊ लोकांना अटक केली होती. मात्र या गुन्ह्यात मास्टरमाइंड मुख्य आरोपी प्रेमचंद जैस्वाल वय 54 वर्ष आणि त्याच्या साथीदार पडून गेले होते. सायन पोलिसांनी तांत्रिक तपास करून तब्बल दीड महिना नंतर दोन्ही आरोपींना दिल्ली मधून अटक केली आहे.


दोन आरोपींना दिल्लीमधून अटक


अटक मुख्य आरोपीचे नाव प्रेम चंद जैस्वाल वय 54 वर्ष आणि त्याचा साथीदार आरोपी कृष्णा नाईक वय 34 वर्ष आहे. प्रेमचंद जैस्वाल हा मास्टरमाइंड आरोपी असून त्याच्यावर मुंबई शहरात अशाच पद्धतीने रॉबरी करण्याचे पाच गुन्हे  दाखल आहेत. सध्या सायन पोलिसांनी दिल्लीमधून या दोन्ही आरोपीला अटक करून मुंबईला घेऊन येऊन या आरोपीचा आणखी कोण साथीदार आहे का? मुंबई शहरात या आरोपीने किती चोऱ्या केल्या आहेत, या संदर्भात अधिक तपास सुरु आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


नाईट ड्युटीवरुन घरी जाताना भीषण अपघात, पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू; 2 चिमुकल्यांसह कुटुंबांवर दु:खाचा डोंगर