T20 World Cup 2024 India vs South Africa Final: टी-20 विश्वचषकाचा (T20 World Cup 2024) नवा विजेता कोण ठरणार, भारत की दक्षिण आफ्रिका? तुमच्या आमच्या मनातल्या या प्रश्नाचं आज बार्बाडोसच्या रणांगणात मिळणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री आठ वाजता सुरु होईल.


टी-20 किंवा वन डे विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ फायनलच्या मैदानात आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. टी-20 विश्वचषकात भारताची फायनलमध्ये धडक मारण्याची तिसरी वेळ आहे. पण आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी बजावली आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही संघांनी यंदाच्या विश्वचषकात प्राथमिक आणि अव्वल साखळीवरही आपला ठसा उमटवला. हे दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित आहेत. त्यामुळं यंदाचा टी-20 विश्वचषक कोण जिंकतो, याकडे क्रिकेटरसिकांचं लक्ष लागलं आहे.


भारताने 2007 पाकिस्तानला पराभूत साली टी-20 विश्वचषक जिंकला होता. तर 2014 साली अंतिम सामन्यात भारतीय संघ दाखल झाला होता. यावेळी बांगलादेशकडून पराभवाचा सामना करावा लागला. यंदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला इतिहास रचण्याची संधी आहे. याचदरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने रोहित शर्माला एक सल्ला दिला आहे. टीम इंडिया संपूर्ण विश्वचषकात अपराजित आहे, त्यामुळे त्यांना काहीही बदल करण्याची गरज नाही. टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूला उत्तम प्रदर्शन करावं लागणार आहे. जर प्रत्येक खेळाडूने आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली, तर टीम इंडियाला पराभूत करणं अवघड जाणार असल्याचं रिकी पाँटिंग म्हणाला.


रोहित-विराटचा आज अखेरचा सामना?- 


भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज रोहित शर्मा आणि विराट कोहली आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 'टी-20' विश्वचषकाचा अंतिम सामना खेळून या प्रकाराला अलविदा करू शकतात. काही महिन्यांआधी फायनल गमावताच दोघांच्या डोळ्यांत दुःखाचे अश्रू तरळले होते. आज डोळ्यांत अश्रू यायला हवेतः पण ते आनंदाचे! रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने फायनल जिंकून विश्वचषक दिमाखात उंचवावा, अशी प्रत्येक चाहत्याची मनोमन इच्छा आहे. बीसीसीआय आणि निवडकर्ते फायनलनंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांना या प्रकारात संधी देणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.


टी-20 विश्वचषकात कोणत्या संघाचा वरचष्मा आहे? 


दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचा वरचष्मा राहिला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ 26 वेळा T20 फॉर्मेटमध्ये आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला 14 वेळा पराभूत केले आहे, तर 11 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. दोनवेळा दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. अशाप्रकारे, या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, टी-20 फॉरमॅटमध्ये भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्चस्व गाजवत आहे, परंतु अंतिम फेरीत काय होते हे पाहणे मनोरंजक असेल.


संबंधित बातम्या:


T20 World Cup 2024 Ind vs SA Final: रोहित शर्मा-विराट कोहलीला BCCI कडून पुन्हा संधी नाही?; आज अखेरचा टी-20 सामना ठरण्याची शक्यता


T20 World Cup 2024 Ind vs SA Final: राखीव दिवसापासून 'सुपर ओव्हर'पर्यंत; टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाऊस पडल्यास आयसीसीचे नियम काय?


T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषक विजेता संघ होणार मालामाल; पराभूत झालेल्या संघांवरही पैशांचा पाऊस!