Child Murder with Axe : तंबाखू दिली नाही म्हणून एका व्यक्तीनं पाच वर्षांच्या पुतण्याला कुऱ्हाडीने (Crime News) सपासप वार करत संपवलं. मध्य प्रदेशमधील (Madhya Pradesh) शहडोल जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल कऱण्यात आला असून चौकशी सुरु आहे.
मध्य प्रदेशमधील शहडोल जिल्ह्यात धक्कादायक घटना घडला. तंबाखू दिली नाही म्हणून व्यक्तीला राग अनावर आला. त्याने झोपेत असणाऱ्या भावजयी आणि पुतण्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. यामध्ये पाच वर्षांच्या पुतण्याचा जागीच मृत्यू झाला. भावजयी या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शहडोल जिल्ह्यातील ब्योहारी पोलिस स्टेशनच्या परिसरात ही घटना घडली. पोलिस अधिकाऱ्याने याबाबत सांगितलं की, बरकछ गावात शनिवारी रात्री आरोपीने रागाच्या भरात हल्ला केला. तंबाखू दिली नाही, त्यामुळे त्या व्यक्तीने झोपत असणाऱ्या मायलेकावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. हल्लोखोराचं नाव रमला कोल असे आहे. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. रमला कोल याच्या हल्ल्यामध्ये पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय. तर महिला गंभीर जखमी झाली आहे.
तंबाखू नसल्याचं सांगितलं अन्
ब्योहारी पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यानं पीटीआयला सांगितले की, 30 वर्षीय हल्लोखोर रमला कोल याने मोठ्या भावाची पत्नी सुक्खी (35 वर्ष) यांच्याकडे तंबाखू मागितली. सुक्खी यांनी तंबाखू नसल्याचे सांगत त्याला टाळले. त्यावरुन रमला कोल याला राग आला. वहिणीने तंबाखू नसल्याचं सांगितल्याचं रमला कोल याच्या जिव्हारी लागलं. यावरुन तो प्रचंड रागाला गेला. संतापलेल्या रमला कोल याने रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सुक्खी यांच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. त्यानंतर झोपेत असणार्या सुक्खी आणि पाच वर्षाच्या मुलावर कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यानंतर तेथून पळ काढला.
चिमुकल्याचा दुर्देवी अंत -
पोलिस अधिकारी मोहन पडवार यांनी सांगितलं की, रमला कोल याच्या हल्ल्यामध्ये पाच वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्देवी अंत झालाय. तर त्याची आई गंभीर जखमी आहे. तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. भादवि कलम 302 (हत्या) नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याशिवाय इतर कलमाअंतर्गतही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी रमला कोल याला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास सुरु आहे.
प्रियकराचं डबल डेटिंग, अपमानास्पद वागणूक; प्रियसीने हॉस्टेलमध्ये गळफास घेत संपवलं आयुष्य!