Fabian Allen : दक्षिण आफ्रिका प्रिमियर लीग स्पर्धेमधील (SA20) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. वेस्ट इंडिजचा (West Indies cricket team) स्टार खेळाडू फॅबियन एलन (Fabian Allen) याचा जीव थोड्यात वाचला आहे. फॅबियन अॅलन याला बंदूकीच्या धाकावर लुबाडल्याचं प्रकरण समोर आले. त्यामध्ये त्याचा जीव थोडक्यात वाचला आहे. क्रिकबजनं याबाबतचं वृत्त दिले आहे. फॅबियन एलन याच्यासोबत घडलेल्या या धक्कादायक घटनेनंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.
जोहान्सबर्ग येथे चोरांनी फॅबियन अॅलन याला लुटलेय. जमैकाचा 28 वर्षीय अष्टपैलू खेळाडू फॅबियन अॅलन याला हॉटेलबाहेर चोरांनी लुबाडले. दक्षिण आफ्रिका प्रिमियर लीग (SA20) स्पर्धेत फॅबियन अॅलन हा पार्ल रॉयल्स संघाचा सदस्य आहे. फॅबियन अॅलन याच्यासोबत घडलेल्या या दुर्देवी घटनेला पार्ल रॉयल्स आणि वेस्ट इंडिज क्रिकेटनं दुजोरा दिला. फॅबियन अॅलन यांच्या जिवाला कोणताही धोका झाला नाही. वेस्ट इंडिज बोर्डाच्या प्रतिनिधीने फॅबियन अॅलन यांच्यासोबत चर्चा केली. दरम्यान, खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
अॅलन सध्या ठीक -
आमचे मुख्य कोच आंद्रे कोली, जे जमैका येथीलच आहेत. त्यांनी फॅबियन अॅलन याच्यासोबत संपर्क केला. त्यांच्यामध्ये चर्चा झाली. अॅलन आता ठिकाय, असे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने क्रिकबजला सांगितले.
खेळाडूंच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न -
दक्षिण आफ्रिका प्रिमियर लीग स्पर्धा सध्या अंतिम टप्प्यात आहे. यावेळी हल्लेखोरांनी 28 वर्षीय फॅबियन अॅलन याला जोहान्सबर्ग येथील प्रसिद्ध सन हॉटेलजवळ घेरलं. त्याला बंदूकीच्या धाकावर धमाकवलं. त्याच्याकडून स्मार्टफोन आणि बॅग हिसकावलं. या घटनेनंतर दक्षिण आफ्रिका प्रिमियर लीग स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
10 जानेवारी रोजी फायनल -
दक्षिण आफ्रिका प्रिमियर लीग स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंच्या सुरक्षेबाबत दुसऱ्यांदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेय. याआधीही असेच काही घडले होते. दक्षिण आफ्रिका प्रिमियर लीग स्पर्धेचा हा दुसरा हंगाम आहे. सध्या प्लेऑफच्या लढती सुरु आहेत. पार्ल रॉयल्स क्वालिफायर 1 नंतर आता सात फेब्रुवारी रोजी एलिमिनेटर खेळणार आहे. 10 फेब्रुवारी रोजी फायनलची लढत होणार आहे.
आणखी वाचा :