Mumbai News : देशातील सर्वात मोठा आणि कुख्यात ड्रग सप्लायर कैलास राजपूत (Kailas Rajput) उर्फ ​​केआरचा शोध अखेर लागला आहे. मुंबई पोलिसांनी भारतातील मोस्ट वॉन्टेड ड्रग सप्लायर कैलास राजपूतचा लंडनमध्ये शोध घेतला आहे. भारताचा मोस्ट वॉन्टेड ड्रग सप्लायर कैलास राजपूत आता लवकरच भारतात येणार असून, मुंबई पोलिसांनी या फरार आरोपीचा शोध घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास राजपूत उर्फ ​​केआर सध्या यूकेमध्ये असून त्याला भारतात आणण्यासाठी भारतीय एजन्सी लंडन पोलिसांच्या संपर्कात आहे.   


यूके सरकारने जप्त केला पासपोर्ट : 


कैलास राजपूतचा पासपोर्ट यूके सरकारने जप्त केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास राजपूतला सध्या कडक नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. भारतात एमडी ड्रग्जचा पुरवठा करण्यात राजपूतची महत्त्वाची भूमिका असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. यामध्ये  कैलास राजपूतचे नाव अनेकदा समोर आले आहे. मुंबई क्राईम ब्रँच, दिल्ली स्पेशल सेल, डीआरआय (DRI) आणि एनसीबी (NCB) यांसारख्या वेगवेगळ्या एजन्सीमध्ये कैलाश राजपूतवर अनेक गुन्हे दाखल आहेत. एजन्सींनी त्याच्याविरुद्ध एलओसी (LOC) देखील जारी केले आहे.


यापूर्वी, कोविडपूर्व काळात तत्कालीन एएनसी प्रमुख शिवदीप लांडे, गुन्हे शाखा प्रमुख संतोष रस्तोगी यांनी कैलास राजपूतला भारतात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. त्यावेळी ते दुबईत होते. परंतु, त्यानंतर कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे एजन्सी त्याला भारतात आणण्यात अपयशी ठरली होती.


असाच एक प्रकार समोर आला जेव्हा एनसीबीचे तत्कालीन मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी चिंकू पठाण नावाच्या आरोपीला नवी मुंबईतून अटक केली होती आणि त्यानंतर आरिफ भुजवाला या आरोपीला अटक केली होती. या दरम्यान आरोपींची चौकशी केली असता कैलाश राजपूतचे नाव समोर आले होते.


परदेशातही अंमली पदार्थांचा व्यापार :


कैलास राजपूत केवळ भारतातच नाही तर आखाती आणि युरोपीय देशांमध्येही अंमली पदार्थांचा व्यापार करतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कैलास राजपूत 2014 पासून फरार आहे आणि भारतातून पळून जाण्यात यशस्वी झाल्यानंतर तो दुबईमध्ये जाऊन लपला, त्यानंतर तो जर्मनीला गेला आणि आता लंडनमध्ये लपला आहे.


महत्वाच्या बातम्या :