Aurangabad News: औरंगाबादच्या हिरापूर शिवारात एक धक्कादायक घटना समोर आली असून, 'लिव्ह इन' रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या माजी सैनिकाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. संजय कौशलसिंग राठोर (वय 40 वर्षे, भांगसीमाता हौसिंग सोसायटी, हिरापूर) असे आत्महत्या केलेल्या माजी सैनिकाचे नाव आहे.  संजय हे गतवर्षी लष्करातून सेवानिवृत्त झाले होते. तर ते मूळचे गुजरातचे असून ते एका महिलेसोबत 'लिव्ह इन रिलेशनशिप' मध्ये हिरापूर शिवारात राहत होते. 


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय राठोर यांनी रविवारी दुपारी लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेला दारू आणण्यासाठी बाहेर पाठवले. काही वेळाने त्या दारू घेऊन घरी आल्या तेव्हा दार बंद होते. त्यामुळे त्यांनी दरवाजा वाजविला परंतु, आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. बराच प्रयत्न केल्यावरही काहीच प्रतिसाद न मिळाल्याने महिलेने अखेर, चिकलठाणा पोलिसांना कळविले. माहिती मिळताच काही वेळातच पोलिस तिथे पोहचले. पोलिसांच्या उपस्थितीत दरवाजा तोडण्यात आला. तेव्हा संजय राठोर हे रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडलेले दिसले. पोलिसांनी त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात नेले. तेथून घाटीत हलविले. मात्र, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांनी स्वतः च्या 9 एमएम पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी पिस्तूल व काडतूस जप्त केले आहे.


फेसबुकच्या माध्यमातून झाली होती ओळख...


संजय राठोर हे वर्षभरापूर्वी लष्कारातून सेवानिवृत्त झाले होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब अहमदाबाद येथे राहते. काही वर्षांपूर्वी त्यांची हिरापूर शिवारातील एका महिलेसोबत फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर ते एकमेकांच्या संपर्कात आले. सेवानिवृत्त झाल्यापासून संजय राठोर हे त्या महिलेसाबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.


'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या महिलेस जोडीदाराने पेटविले 


दुसऱ्या एका घटनेत बीड जिल्ह्यातील वडवणी येथे लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेस जोडीदाराने डिझेल टाकून पेटविले. यात महिला गंभीररीत्या भाजली असून उपचार सुरू आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका 22 वर्षीय महिलेच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. सहा महिन्यांपासून ती बळिराम राजाभाऊ इचके (रा. उपळी ता. वडवणी) याच्याशी लिव्ह इनमध्ये राहते. दरम्यान घरातील स्टोव्हचे इंधन संपल्याने महिलेने स्वयंपाक केला नव्हता. डिझेल आणण्यावरून तिचे बळिरामशी कडाक्याचे भांडण झाले. ज्यातून बळिरामने महिलेला डिझेल टाकून पेटवून दिले आहे. 


महत्वाच्या बातम्या... 


Aurangabad: लिव्ह इनमधून गर्भधारण, न्यायालयाने गर्भपाताची परवानगी नाकारली


औरंगाबादमध्ये हायप्रोफाईल किडनॅपिंग! निवृत्त अधिकाऱ्याचे अपहरण, तब्बल पावणेतीन कोटी रुपयांची खंडणी मागितली