Mira Road : आर्थिक टंचाईला कंटाळून एका कुटुंबाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. माञ यात सात वर्षाच्या चिमुरडीचा जीव गेला आहे. तर पत्नी अतिदक्षता विभागात उपचार घेतेय. नवरा माञ या घटनेनंतर फरार झाला आहे. दहिसर चेक नाकाच्या पुढील काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिजन्स बॅनक्युटस् या हॉटेल मध्ये ही दुर्देवी घटना घडली.
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाजवळील दहिसर चेक नाक्याच्या पुढे सिजन्स बॅनक्युटस या हॉटेल मध्ये एका कुटुंबाने आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला माञ दुर्दैवाने यात एक सात वर्षीय चिमुरडी मयत झाली आहे. तर चिमुरडीची आईवर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. तर पती माञ या घटनेनंतर फरार झाला आहे. 27 मे रोजी सिजन्स बॅनक्युटस या हॉटेलमध्ये रायन ब्रॅको, त्याची पत्नी पूनम ब्रॅको, आणि सात वर्षाची चिमुरडी अमायका ब्रॅको राहण्यासाठी आले होते. माञ आज सकाळी दहाच्या सुमारास ओरडण्याचा आवाज आल्याने हॉटेलच्या कर्मचा-यांनी त्यांच्या रुमचा दरवाजा खोलून आत प्रवेश केल्यावर ही घटना समोर आली. काशिमीरा पोलिसांना घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. तर जखमी पूनम ला दवाखान्यात औषोधोपचारासाठी पाठवलं आहे. पूनम ने पोलिसांना दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सध्या त्यांची आर्थिक स्थित ठीक नव्हती. त्यामुळे संपूर्ण कुटुंब आत्महत्या करणार होतं. काल ब्रॅकोने झुरळ आणि उंदिर मारण्याची गोली आणि लिक्विड घेवून आला होता. राञी तिघांनीही विषारी औषधे खाली. माञ त्या औषधांचा पूनम आणि ब्रॅको वर परिणाम झाला नाही. ब्रॅको ने पूनमचा गळा दाबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न ही केला. माञ ती ओरडल्याने तो तेथून पळून गेला. २७ मे पूर्वी ब्रॅको आपल्या कुटुंबासह वसईतील वेस्टर्न या हॉटेलमध्ये ही राहिला होता. तेथे त्याचे १५ हजार ही बाकी होते. त्यानंतर तो या हॉटेलमध्ये आला होता.
ब्रॅकोची फेसबुक प्रोफाईल बघितल्यावर तो आर.एस.व्ही.पी येथे जॉब करतोय, तर तो Scrabble Digitial lab मध्ये मॅनेजर होता. तसेच तोReliance media Works मध्ये ही सिनिअर एक्झ्युक्टिव होता. आता असं काय झालं की हे कुटुंब आत्महत्या करण्यासारखं टोकाच पाउल उचळलं त्यांनी याचा तपास आता काशिमिरा पोलीस करत आहेत.