ठाणे: मीरा रोड येथे कथित लव्ह जिहादच प्रकरण उघडकीस आलं आहे. याप्रकरणी नयानगर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मीरा भाईंदर शहरात राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणीने नयानगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, तिचा मुस्लिम प्रियकराने आत्महत्येची धमकी देवून, तिच्याशी प्रेमसंबध आणि शारिरीक संबंध ठेवले. त्यानंतर पीडितेचे नग्न व्हिडीओ वायरल करण्याची धमकी देत लग्न करुन, तिचा मानसिक आणि शारिरीक छळ केल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे.  


काय आहे तक्रारीत? 


नयानगर पोलीस ठाण्यात तक्रार झाल्यानंतर लव्ह जिहादच प्रकरण उजेडात आलं आहे. एका 22 वर्षीय पीडितेने नयानगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की, 2022 मध्ये तिची बोरिवलीतील शेहबाज नावाच्या मुलाशी ओळख झाली होती.  शेहबाज अनेकदा मीरा रोड स्टेशनजवळ तिला भेटायला यायचा जिथे तो कॉम्प्युटर क्लासमध्ये कॉम्प्युटर शिकवत होता. त्याने पीडित मुलीची ओळख अमीन शेखशी करून दिली. काही दिवसांच्या भेटीनंतर 16 फेब्रुवारी 2022 रोजी अमीन शेखने पिडितेला कॉम्प्युटर क्लासच्या बाहेर भेटण्यास बोलावून, तिला  प्रपोज केलं. प्रेमाला नकार दिल्यास चाकू काढून स्वतःला संपवण्याची त्याने धमकी दिली.


पीडितेने घाबरुन त्याला होकार दिला. त्यानंतर कुटुंबाशी ओळख करुन दिली. त्या तरुणाचं लग्नही झालं होतं पण त्याने ते लपवलं आणि त्याच्या लहान मुलीची ओळख ही भावाची मुलगी अशी करुन दिली. काही दिवसानंतर फसवून घरात बोलवून, स्वतःच जीवन संपवण्याची धमकी देत, तिच्यावर अत्याचारही केला आणि त्याचे व्हिडीओ बनवले. नंतर लग्नाची मागणी घालत, नग्न व्हिडीओ वायरल करण्याची धमकी देत 21 जून 2022 रोजी जबरदस्तीने मुस्लिम मौलानाच्या मदतीने लग्न केलं. यावेळी अमीनचे दोन मित्र सोबत होते. तिला आता तू मुस्लिम असल्याच सांगत, तू आता काफिर राहणार नाहीस असं सांगितलं. त्यानंतर त्याने 100 रुपयाच्या तीन स्टँप पेपरवर तिच्या सह्याही घेतल्या.


त्यानंतर अमीनने पिडितेला उत्तनच्या हजरत बालेशाह सय्यद दर्ग्यात नेवून तिच्या हातावर तावीज बांधला. दुसर्‍या दिवशी अमीनच्या घरी गेल्यावर त्याच पहिलं लग्न झालं असल्याच कळलं. घरातील भावाची मुलगी म्हणून सांगत असलेली मुलगी ही पहिल्या बायकोची असल्याच कळलं. घरात गेल्यावर पीडित एकदा आजारी पडल्यावर घरी एका मौलानाला बोलावून, तिला एक कागद पाण्यात टाकून प्यायला दिलं. गाईच्या मटणाची बिर्याणी खाल्यावर आजार बरा होईल असा सल्ला दिला. 


नोव्हेंबर महिन्यात घरातल्यांशी भांडण झाल्यावर अमीन पीडितेला घेवून, अपना नगर फेझ-2 येथे घेवून राहायला गेला. तेथे तो रुममध्ये एकटीला ठेवून, बाहेरुन लॉक लावून घराबाहेर जायचा. डिसेंबरमध्ये पीडितेने आरडाओरड करुन, शेजाऱ्यांना बोलावलं. शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावून लॉक तोडून घरात प्रवेश केला आणि पिडीतेची सुटका केली.


त्यावेळी ही पिडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पीडिता आपल्या वडिलांकडे रहात असताना, अमीन तिचे नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, परत घरी बोलवत होता. मानसिक आणि शारिरीक त्रासाने थकलेल्या पीडितेने अखेर नयानगर पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावून, तिचा प्रियकर अमीन आझम शेख, त्याची आई रेश्मा आझम शेख, लग्न लावून देणारा मौलाना काझी मुफ्तिन इस्माईल, त्याचे दोन मित्र, जरीब सलीम सय्यद आणि दुसरा अनोळखी या सर्वांविरोधात व्यक्तीविरुद्ध नया नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नया नगर पोलिसांनी भादवि कलम 376(2)(एन), 366, 323, 504, 406 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यात अमीन त्याची आई रेश्मा, मौलाना काझी, मिञ जरीब सय्यद यांना अटक केली आहे. 


ही बातमी वाचा: