Maharashtra Assembly Session: अजित पवारांच्या (Ajit Pawar) सत्तेतील सहभागानंतर शिंदे गटातील अनेकजणांना मंत्रिपदाच्या इच्छेवर पाणी सोडावं लागल्याची चर्चा असतानाच आता विधासभेतील आसनव्यवस्थाही बदलली आहे. आधीच्या सरकारमध्ये पहिल्या रांगेत असलेल्या शिंदे गटाच्या गुलाबराव पाटील, दादा भूसे आणि संजय राठोड यांना आता दुसऱ्या रांगेत बसावं लागत आहे. 

अजित पवारांचा गट सत्तेत सामील झाल्यानंतर आता पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभेतील आसनव्यवस्थाही बदलली आहे. त्यामध्ये शिंदे गटाच्या गुलाबराव पाटील, दादा भूसे आणि संजय राठोड यांना पहिल्या रांगेतून दुसऱ्या रांगेत जावं लागलं आहे. तर शिंदे गटाच्या अब्दुल सत्तार यांना पहिल्या रांगेत बसायची संधी मिळाली आहे. 

शिंदे गटाचे तीन मंत्री मागच्या रांगेत गेल्यानंतर त्या ठिकाणी आता अजित पवार, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ यांची वर्णी लागली आहे. पहिल्या रांगेत आधी दहा मंत्री बसायचे, आता त्या रांगेत बारा मंत्री बसत असल्याचं चित्र आहे. 

मंत्र्यांची शिंदे फडणवीस सरकारमधील विधानसभेतली आसनव्यवस्था- (पहिली रांग) 

1. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे2. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 3. राधाकृष्ण विखे पाटील 4. सुधीर मुनगंटीवार 5. चंद्रकांत पाटील6. विजयकुमार गावित 7. गिरीश महाजन 8. गुलाबराव पाटील 9. दादा भुसे 10. संजय राठोड  हे 10 मंत्री पहिल्या रांगेत बसत होते. मात्र, आता राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या सहभागानंतर शिवसेना शिंदे गटातील तीन मंत्री- गुलाबराव पाटील, दादा भुसे आणि संजय राठोड यांना दुसऱ्या रांगेत बसावे लागले आहे. 

अजित पवारांच्या सरकारमधील सहभागानंतर सध्याची बैठक व्यवस्था 

1. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे2. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 3. उपमुख्यमंत्री अजित पवार 4. मंत्री छगन भुजबळ5. राधाकृष्ण विखे पाटील 6. सुधीर मुनगंटीवार 7. दिलीप वळसे पाटील8. विजयकुमार गावित 9. हसन मुश्रीफ10. अब्दुल सत्तार 11. चंद्रकांत पाटील 12. गिरीश महाजन

राष्ट्रवादीच्या सहभागानंतर विरोधी पक्षात असलेले आदित्य ठाकरे आणि अजय चौधरी यांची आसनव्यवस्था चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांना दिली आहे. थोडक्यात आधीच्या मंत्रिमंडळात पहिल्या रांगेत 10 मंत्री बसायचे. आता 12 मंत्री बसत आहेत. विरोधी बाकांवर-  नरहरी झिरवळ, बाजूला विरोधी पक्षनेत्याची रिक्त जागा ठेवण्यात आाली आहे. त्यानंतर बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील, अजय चौधरी, आदित्य ठाकरे बसले आहेत. 

छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील हे विरोधी पक्षाच्या पहिल्या बाकावर बसायचे. मात्र ते आता सत्ताधारी पक्षाच्या पहिल्या रांगेत बसलेले पाहायला मिळत आहेत.

ही बातमी वाचा: