एक्स्प्लोर

Congress : काँग्रेस नेत्यांवर वसुलीचा गंभीर आरोप, गोवा वसुली प्रकरणाचे मुंबई कनेक्शन

Goa Congress Controversy: गोव्यातील वन गोवा प्रकल्पातील कथित खंडणी प्रकरणात मुंबई पोलिसांनी कारवाई केल्यानंतर भाजपने काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंवर वसुलीचा आरोप केला आहे.

मुंबई: गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण कमालीचे तापले असून भाजपने काँग्रेसवर खंडणी आणि वसुलीचे अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. भाजपच्या सोशल मीडिया विभागाचे पदाधिकारी प्रकाश गाडे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. 

गोव्यातील बिचोलीम तालुक्यातील करापूर येथील वन गोवा प्रकल्पाभोवती सुरू असलेल्या वादात मुंबई पोलिसांनी सिद्धेश तारी आणि प्रितेश साळगावकर या दोघांना कथित खंडणी प्रकरणात अटक केली आहे. या अटकेनंतर आता या प्रकरणाचे थेट मुंबई कनेक्शन आणि राजकीय संबंध उघडकीस येत असल्याचा दावा भाजपने केला आहे.

भाजप नेते प्रकाश गाडे यांनी या प्रकरणावरून काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. "गोवा काँग्रेसचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील वसुलीची पद्धत आता गोव्यातही सुरू केली आहे. काल मुंबईत अटक करण्यात आलेली वसुली टोळी ही थेट काँग्रेसचीच निघाली आहे," असा गंभीर आरोप गाडे यांनी केला.

गाडे पुढे म्हणाले की, "अटक करण्यात आलेल्या सिद्धेश तारी याच्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे फोटो समोर आले आहेत. विकास प्रकल्पांना विरोध करणे आणि खंडणी न मिळाल्यास प्रोजेक्ट बंद पाडणे ही काँग्रेसची जुनीच सवय आहे."

आर्थिक व्यवहारांवर अनेक गंभीर प्रश्न

करापूर-सारवण परिसरात या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी आंदोलन केले होते. मात्र, आता समोर आलेल्या एका कथित ऑडिओ क्लिपमुळे या प्रकरणाभोवती खंडणीचे सावट निर्माण झाले आहे. या ऑडिओमध्ये आर्थिक देवाणघेवाणीचा स्पष्ट उल्लेख ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे. या संभाषणात काही लोकांच्या सह्या, काम थांबवणे आणि आंदोलनाबाबत चर्चा होत असल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणात एकूण 41 लाखांच्या कथित व्यवहारांचा उल्लेख समोर आला असल्याचा दावा करण्यात येत आहे. आंदोलनाचा वापर आर्थिक फायद्यासाठी केला गेला का? आणि या कथित वसुलीच्या जाळ्यात आणखी कोणत्या मोठ्या राजकीय व्यक्तींचा सहभाग आहे? याचा शोध आता तपास यंत्रणा घेत आहेत.

या संपूर्ण प्रकरणाची सत्यता समोर येण्यासाठी कथित ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक आणि तांत्रिक तपासणी करण्याची मागणी होत आहे. संभाषणातील व्यक्तींचे फोन कॉल्स, व्हॉट्सॲप चॅट्स, बँक व्यवहार आणि डिजिटल पुराव्यांची सखोल चौकशी करून या आर्थिक व्यवहारांची साखळी स्पष्ट केली जावी, अशी मागणी जोर धरत आहे.

ही बातमी वाचा: 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; तुकाराम मुंढेंच्या FDAच्या कारवाईचा धडाका, तीन महिन्यांत 880 औषध आस्थापनांवर कारवाई, न्यायालयाचेही महत्वाचे आदेश
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; तुकाराम मुंढेंच्या FDAच्या कारवाईचा धडाका, तीन महिन्यांत 880 औषध आस्थापनांवर कारवाई, न्यायालयाचेही महत्वाचे आदेश
Mumbai Crime Khar: मुंबईच्या खारमध्ये वेश्याव्यवसाय, मॉडेल तरुणीची सुटका; हॉटेलमध्ये काँडमची तीन पाकिटं, आयफोन प्रो मॅक्स अन् कॅश सापडली
मुंबईच्या खारमध्ये वेश्याव्यवसाय, मॉडेल तरुणीची सुटका; हॉटेलमध्ये काँडमची तीन पाकिटं, आयफोन प्रो मॅक्स अन् कॅश सापडली
Palghar Hospital Row : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी कारवाई, डॉक्टरांना मारहाण प्रकरणात पालघरच्या शहरप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी कारवाई, डॉक्टरांना मारहाण प्रकरणात पालघरच्या शहरप्रमुखाची पक्षातून हकालपट्टी
मन हेलावणारी दुर्घटना; रिक्षा अन् पिकअपचा भीषण अपघात, आईसह दोन लहानग्यांचा मृत्यू, परिसरात हळहळ
मन हेलावणारी दुर्घटना; रिक्षा अन् पिकअपचा भीषण अपघात, आईसह दोन लहानग्यांचा मृत्यू, परिसरात हळहळ
Advertisement

व्हिडीओ

Gunratna Sadavarte On Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरे ते संजूबाबा, जरांगे बिनबुडाचं गाडगं, सदावर्तेंची आक्रमक प्रेस
Vishakha Raut Nagarsevak : नगरसेवक पद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; ठाकरेंची वाघीण विशाखा राऊत काय म्हणाल्या?
Maharashtra Drought : पावसाअभावी दशा, आता कृत्रिम पावसाची आशा?
Pune MPSC Students Protest : एमपीएससीवर रोष विद्यार्थ्यांचा आक्रोश! | Special Report ABP Majha
Manoj Jarange Andolan : लढाई आरक्षणाची चर्चा जरांगेंच्या भाषेची | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Khar: मुंबईच्या खारमध्ये वेश्याव्यवसाय, मॉडेल तरुणीची सुटका; हॉटेलमध्ये काँडमची तीन पाकिटं, आयफोन प्रो मॅक्स अन् कॅश सापडली
मुंबईच्या खारमध्ये वेश्याव्यवसाय, मॉडेल तरुणीची सुटका; हॉटेलमध्ये काँडमची तीन पाकिटं, आयफोन प्रो मॅक्स अन् कॅश सापडली
Samadhan Sarvankar On Vishakha Raut: विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
विशाखा राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी 20 नगरसेवक फोडून पक्षात आणते; समाधान सरवणकरांचा खळबळजनक दावा
Nana Patole: कोरोना लसीमुळे कर्करोग अन् हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले; आमदार नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
कोरोना लसीमुळे कर्करोग अन् हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले; आमदार नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
UP Hira Thakur : हिरा ठाकूर यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
हिरा ठाकूर यांचा अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश, निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का
Jalgaon Dahihandi Row : 51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
Sanjay Dutt Refuses To Speak Marathi: 'मी सहा वर्षे पुण्याच्या येरवडा तुरुंगात होतो तरीही मराठी शिकलो नाही'; संजय दत्तनं प्रताप सरनाईकांची मराठीत बोलण्याची विनंती धुडकावली, पाहा VIDEO
'मी सहा वर्षे पुण्याच्या येरवडा तुरुंगात होतो तरीही मराठी शिकलो नाही'; संजय दत्तनं प्रताप सरनाईकांची मराठीत बोलण्याची विनंती धुडकावली, पाहा VIDEO
Maharashtra Live blog updates: अमरावती शहरातील रहमत नगरमध्ये युवकाची हत्या
Maharashtra Live blog updates: अमरावती शहरातील रहमत नगरमध्ये युवकाची हत्या
Non Veg In Durga Puja : आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
Embed widget