ठाणे : गणपत गायकवाड आणि वैभग गायकवाडच्या नादाला लागू नकोस नाहीतर तुझा बाबा सिद्दीकी होईल असे धमकीचे पत्र कल्याणच्या महेश गायकवाडांना आलं आहे. हे पत्र जेलमधून भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाडांनीच पाठवलं असल्याचा महेश गायकवाडांचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. गणपत गायकवाडांनी गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये महेश गायकवाडांवर पोलिस ठाण्यातच गोळीबार केला होता. त्या प्रकरणात गणपत गायकवाड हे तुरुंगात आहेत.
महेश गायकवाड हे शिवसेना शिंदे गटाचे माजी शहराध्यक्ष आहेत. विधानसभेच्या वेळी त्यांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. या आधीही त्यांना धमकी मिळाली होती.
गणपत गायकडांनी धमकी दिल्याचा आरोप
अंबरनाथ मधील आनंद नगर येथे सामूहिक विवाह समारंभासाठी महेश गायकवाड गेले असता त्यांच्या हातामध्ये अज्ञात व्यक्तीने एक लिफाफा (कागदी पाकीट) दिले. नेहमी प्रमाणे नागरिक आपली समस्या महेश गायकवाड यांना निवेदनाद्वारे देत असल्याने त्यांनी या लिफाफा पाहिला नाही. शनिवारी त्यांनी हा लिफाफा पाहिला असता त्यात धमकीचे पत्र असल्याचं समोर आलं. त्यानंतर महेश गायकवाड यांनी अंबरनाथमधील शिवाजी नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
हे पत्र जेलमधून पाठवण्यात आले असल्याचा आरोप महेश गायकवाड यांनी केला. हा गंभीर प्रकार असताना पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या पत्राचा तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पत्रातील मजकूर काय?
M G तू गणपत शेठ वैभव के पिछे मत लग. नहीं तो तेरा बाबा सिद्दीकी होगा
गणपत गायकवाड यांच्याकडून पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार
भाजपचे कल्याण पूर्वचे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे त्यावेळचे शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर पोलिस स्टेशनमध्येच गोळीबार केला होता. हे प्रकरण 2 फेब्रुवारी 2024 रोजी घडलं होतं.
जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर पोलिस स्टेशनमध्येच गोळीबार केला. या दोघांच्या दरम्यान एका 50 गुंठे जमिनीवरून वाद सुरु होता. 2 फेब्रुवारीला हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहचले. उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात दोघेही आले होते. यादरम्यान, गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर पोलिस स्टेशनमध्येच गोळीबार केला.
ही बातमी वाचा: