Pune News : पुणे जिल्ह्यातील दौंड (Daund News) तालुक्यात एकाच साठवण तलावात बुडून तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तिघेही फोटो शूट करण्यासाठी या साठवण तलावाजवळ गेले असल्याची माहिती समोर येत आहे. दौंड कुरकुंभ मार्गावरील मोरेवस्ती जवळ रविवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. दौंड नगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या  शहराजवळील मेरगळवाडी येथील तलावात पोहण्यासाठी गेले असता या युवकांचा पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री घडली.


असरार अब्दुल अलीम काझी, करिम अब्दुल हादी काझी, अतिक उझजमा फरिद शेख अशी या युवकांची नावे आहेत. याबाबत पोलीसांनी दिलेली माहितीनुसार तिघेजण पोहण्यासाठी दुचाकी वर नगरपालिकेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात गेले होते. बराच वेळ झाल्याने हे घरी आले नाही. यामुळे घराच्यांनी मोबाईल वरती फोन लावला असता फोन बंद होता. 


मित्रांना फोन लावला तर रिंग वाजत होती मात्र तो उचलत नव्हता. यामुळे अब्दुल अलीम काझी, असिम इस्माईल शेख ,रफिक इकबाल सय्यद ,कलिम सलीम सय्यद या सर्वजणांनी त्यांचा शोध दौंड शहर परिसरात घेतला. दौंड शहरात मेगळवाडी, लिंगाळी  येथील पिण्याचे पाणी पुरवठा करणारे दौंड नगरपालिकेच्या तळ्याजवळ जाऊन पाहिले असता तेथे गाडी मिळून आली. 


तलावाच्या नजीक जाऊन शोध घेतला असता तलावाच्या काठाजवळ मुलांचे कपडे व बॅग असे साहित्य मिळून आले. लोकांना संशय आला की, तिघे मुले तलावात पोहत असताना पाण्यात बुडले असावे असा संशय आल्याने दौंड पोलिस स्टेशनला याबाबत माहिती दिली.  


माहिती मिळताच पोलिसांनी  घटनास्थळी धाव घेतली आणि पोलीसांनी लोकांच्या मदतीने तलावातील पाण्यात जावून शोध घेतला असता या तिघांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्यांना दौंड उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले, त्याआधीच तिघांचा  मृत्यू झाला होता, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या