Maharashtra Sangli Crime News : सांगलीतील (Sangli News) धक्कादायक घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला आहे. पतीनं मोबाईलचं लॉक काढून दिलं नाही, म्हणून पत्नी नाराज झाली आणि तिनं टोकाचं पाऊल उचललं. नाराज पत्नीनं गळफास घेत आत्महत्या केली आहे. सांगली (Sangli Crime News) जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात ही घटना घडली.
सांगली (Sangli) जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील शिरटे येथील भगवान खोट हे आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहत होते. शेतजमीन कमी असल्यानं ते सारख कारखान्यात (Sugar Factory) नोकरी करत होते. शेतीतून येणारं थोडंथोडकं उत्पन्न आणि साखर कारखान्यातील नोकरी यावर आपल्या कुटुंबाचा कसाबसा उदरनिर्वाह चालवत होते. काल सकाळी भगवान यांचा मोबाईल पत्नी मनीषा यांनी घेतला. भगवानकडे मनिषानं मोबाईलचा लॉक काढून द्या, असा हट्ट धरला. पण भगवाननं पत्नीच्या हट्टाकडे दुर्लक्ष केलं.
पतीने त्यांच्या मोबाईलचं लॉक काढून दिलं नाही म्हणून नाराज होत पत्नीनं घराच्या तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिरटे येथे घडली आहे. मनीषा भगवान खोत (वय 38) असं मृत महिलेचं नाव आहे. याप्रकरणी इस्लामपूर पोलीस ठाण्यात शिवाजी निवृती खोत यांनी फिर्याद दिली आहे.
पतीनं मोबाईलचा लॉक काढून द्या, असं सांगून देखील लॉक काढून न दिल्यानं मनीषा निराश झाल्या. काही वेळानंतर मनीषा यांनी बाजूच्या खोलीमध्ये जाऊन साडीच्या सहाय्यानं गळफास घेतला, अशी माहिती पोलिसांत (Sangli Police) तक्रार देताना देण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेतली असून या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :