Asia Cup 2022: भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया आशिया चषकात दम दाखवण्यासाठी सज्ज झालीय. भारताला या स्पर्धेतील पहिला सामना रविवारी (28 ऑगस्ट) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) पाकिस्तानविरुद्ध (IND vs PAK) खेळायचा आहे. या सामन्यात रोहितला कर्णधार म्हणून मोठी कामगिरी करण्याची संधी असेल. कर्णधार म्हणून सर्वाधिक टी-20 सामने जिंकण्याचा विक्रम भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नावावर आहे. त्यानंतर भारतासाठी सर्वाधिक टी-20 सामने जिंकणाऱ्या कर्णधाराच्या यादीत विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटच्या या विक्रमापासून रोहित शर्मा फक्त एक विजय दूर आहे.
विराट कोहलीनं 50 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. त्यापैकी 30 सामन्यात त्यानं भारताला विजय मिळवून दिलाय. तर, रोहित शर्मानं आतापर्यंत 36 टी-20 सामन्यात भारतीय संघाची धुरा संभाळली आहे. यातील 30 सामन्यात निकाल भारताच्या बाजूनं लागलाय. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावावर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम आहे. धोनीनं 72 सामन्यांमध्ये भारताचे कर्णधारपद भूषवलं असून त्यापैकी 41 सामने जिंकले आहेत.
सर्वाधिक आंतराष्ट्रीय टी-20 सामने जिंकणारे कर्णधार-
क्रमांक | भारतीय कर्णधार | सामने | विजय |
1) | महेंद्रसिंह धोनी | 72 | 41 |
2) | विराट कोहली | 50 | 30 |
3) | रोहित शर्मा | 35 | 29 |
सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्यापासून 89 धावा दूर
आशिया चषकात भारताकडून खेळताना रोहित शर्मानं 27 सामन्यांच्या 26 डावांमध्ये 42.04 च्या सरासरीनं 883 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एका शतकाचा समावेश आहे. रोहित शर्माची आशिया चषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळी म्हणजे नाबाद 111 धावांची खेळी आहे. या स्पर्धेत त्यानं 77 चौकार आणि 21 षटकार मारले आहेत. आशिया कपमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. या हंगामात म्हणजेच आशिया कप 2022 मध्ये त्याने 89 धावा केल्यास तो भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडेल. तसेच या स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनेल.
हे देखील वाचा-