Maharashtra Sangli Crime News : खासगी सावकाराच्या तगाद्याला आणि जाचाला कंटाळून एका सलून व्यावसायिकानं आत्महत्या केली आहे. सांगली (Sangli) जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. कडेगाव तालुक्यातील हिंगणगाव खुर्दमधील मनोज सीताराम शिंदे (40) असं या सलून व्यावसायिकाचं (Salon Business) नाव आहे. त्यानं सलून व्यवसायासाठी व्याजानं पैसे घेतले होते. मात्र याच पैशातून खासगी सावकाराच्या तगाद्याला आणि जाचाला कंटाळून त्यानं आत्महत्या केली. ही घटना रविवारी 31 जुलै रोजी पहाटे पाच वाजता हिंगणगाव खुर्द येथे घडली. याप्रकरणी संशयित आरोपी, खासगी सावकार प्रदीप किसन यादव (वय 33, रा. कडेपूर, ता. कडेगाव) यांच्याविरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केलं असता, त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.


प्रदीप यादव यानं जानेवारी 2021 ते 31 जुलै 2022 या कालावधीत मनोज शिंदे यांना सलून व्यवसायासाठी 30 हजार रुपये व्याजानं दिले होते. त्या पैशाचं व्याज म्हणून मनोज शिंदे यांनी 90 हजार रुपये परत दिले होते. तरीही प्रदीप यादव यानं मनोज शिंदे आणि त्यांच्या पत्नी वैशाली शिंदे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच प्रदीप यानं 'तू माझे कसलेही पैसे दिले नाहीस, तू पैसे दिले नाहीस, तर मी तुला सुखानं जगू देणार नाही', अशी धमकी दिली.


प्रदीप यादव हा वारंवार शिंदे यांना शिवीगाळ करून धमकी देऊन मानसिक त्रास (Mental Distress) देत होता. या मानसिक त्रासातून मनोज यांनी 31 जुलै रोजी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान घराच्या बाजूच्या शेडमध्ये दोरीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं फिर्यादीत वैशाली शिंदे यांनी म्हटलं आहे.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :