Wheat prices : गव्हाच्या किंमतीत (Wheat prices) सध्या चांगली वाढ झाल्याचे दिसत आहे. शुक्रवारी अन्न सचिवांची रोलर फ्लोअर मिलर्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याशी बैठक झाली. या बैठकीपूर्वी गव्हाच्या दरात 2 टक्क्यांची घसरण झाली होती. मात्र, बैठकीनंतर गव्हाच्या दरात वाढ झाली आहे. दरम्यान, सप्टेंबरपर्यंत बाजारात गव्हाच्या किंमतीत आणखी 10 ते 15 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळं गहू उत्पादकांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे.


गेल्या पंधरवड्यातच देशभरात गव्हाच्या किंमती 300-350 रुपये प्रति क्विंटलने वाढल्या आहेत. नजीकच्या काळात किंमती स्थिर राहण्याची शक्यता कमी आहे. याबाबतची माहिती  रोलर फ्लोअर मिलर्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अंजनी अग्रवाल यांनी दिली आहे. किंमती जर कायम राहिल्या आणि एका विशिष्ट मर्यादेच्या पलीकडे गेल्या तर सरकार हस्तक्षेप करण्याची देखील शक्यता आहे. किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाजारपेठेने सरकारसमोरील मर्यादित पर्यायांचा विचार केला आहे. सप्टेंबरपर्यंत खुल्या बाजारात गहू विक्री योजनेचे कोणतेही धोरण अपेक्षित नाही. सप्टेंबरनंतर पंतप्रधान गरीब कल्याण योजना सुरु ठेवण्याच्या निर्णयानंतर सरकार विक्रीचा विचार करेल, असशी माहिती गिरणी कामगारांनी दिी आहे. तोपर्यंत गव्हावरील आयात शुल्क काढून टाकणे ही एकमेव धोरणात्मक घोषणा अपेक्षित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.


गव्हाची मागणी वाढली


मागील आठवड्यात देखील देशात गव्हाच्या किंमतीत चांगली वाढ झाली होती.  उष्णेतेच्या लाटेचा गहू पिकाला बसलेला फटका आणि  सध्या गव्हाला होत असलेली मागणी यामुळं किंमती वाढत आहेत. गव्हाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी पुरवठा कमी होत असल्यानं गव्हाच्या किंमतीत वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, बहुतेक शेतकऱ्यांनी त्यांच्या गव्हाची विक्री केली आहे. मात्र, मोठ्या व्यापाऱ्यांकडे सध्या गव्हाचा साठा शिल्लक आहे. सध्या बाजारपेठेत गव्हाची मागणी वाढली आहे. मागणी वाढली तरी पुरवठा मात्र, कमीच आहे. त्यामुळं गव्हाच्या किंमतीत वाढ झाली आहे. सध्या स्थानिक बाजारात गव्हाच्या किंमती या 23 हजार 547 रुपये प्रति टनावर पोहोचल्या आहेत. गव्हाला मिळणारा हा दर विक्रमी असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, 14 मे रोजी सरकारनं निर्यातीवर अचानक बंदी घातली होती. त्यानंतर गव्हाच्या किंमतीत सातत्यानं वाढ होत आहे.


महत्त्वाच्या बातम्या: