Maharashtra Sangli Crime News : सांगलीतील (Sangli Crime News) साधू मारहाण प्रकरणी (Sangli Sadhu Lynching) सहा जणांना अटक करण्यात आली आहे. मुलं पळवणारी चोरांची टोळी समजून चार साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. सांगलीच्या जत तालुक्यातील लवंगा इथं ही घटना घडली आहे. पोलीस चौकशीत गैरसमजुतीतून मारहाण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. 


वाराणसी इथून चार साधू कर्नाटकात देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आटोपून ते लवंगामार्गे विजापूरला जात होते. त्यावेळी रस्त्यात गाडी थांबवून विजापूर रस्ता कोणता अशी विचारणा या साधूंनी एका तरुणाकडे केली. मुलं पळवणारी चोरांची टोळी असा कन्नडमध्ये उल्लेख असलेला साधूचा एक व्हिडीओ तरुणानं पाहिला होता. त्या तरुणाकडेच या साधूंनी रस्त्याबाबत विचारणा केली. व्हायरल व्हिडीओमुळे मुळं पळवणारी टोळीच असल्याची शंका आल्यानं तरुणानं ही बाब गावात कळवली. त्यानंतर या चारही साधूंना गाडीतून ओढून बेदम मारहाण करण्यात आली. काठी, पट्ट्यानं या साधूंना मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. ओळखपत्र आणि आधार कार्ड याबाबतची माहिती देऊनही जमावानं ऐकलं नसल्यानं हा प्रकार घडला आहे. दरम्यान उमदी पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन चारही साधूंची संतप्त जमावाच्या तावडीतून सुटका केली आहे. त्यामुळे पालघरच्या साधू हत्याकांड घटनेची पुनरावृत्ती थोडक्यात टळली आहे.


प्रकरण नेमकं काय? 


पालघरच्या साधू हत्याकांड घटनेची पुनरावृत्ती सांगलीत थोडक्यात टळली. मुलं पळवणारी चोरांची टोळी समजून चार साधूंना बेदम मारहाण करण्यात आली आहे. सांगलीच्या जत तालुक्यातील लवंगा इथं ही घटना घडली. वाराणसी इथून चार साधू कर्नाटकात देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आटोपून ते लवंगामार्गे विजापूरला जात होते. त्यावेळी रस्त्यात गाडी थांबवून विजापूर रस्ता कोणता? अशी विचारणा या साधूंनी एका तरुणाकडे केली. मुले पळवणारी चोरांची टोळी असा कन्नडमध्ये उल्लेख असलेला साधूचा एक व्हिडीओ तरुणानं पाहिला होता. त्या तरुणाकडेच या साधूंनी रस्त्याबाबत विचारणा केली. जुन्या व्हिडीओमुळे मुलं पळवणारी टोळीच असल्याची शंका आल्यानं तरुणानं ही बाब गावात कळवली. त्यानंतर या चारही साधूंना गाडीतून ओढून बेदम मारहाण करण्यात आली. काठी, पट्ट्यानं या साधूंना मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. ओळखपत्र आणि आधार कार्ड याबाबतची माहिती देऊनही जमावानं ऐकलं नसल्यानं हा प्रकार घडलाय. दरम्यान उमदी पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत चारही साधूंची संतप्त जमावाच्या तावडीतून सुटका केली. त्यामुळे पालघरसारखा मोठा अनर्थ टळला आहे. 


सांगली साधू मारहाण प्रकरणी राम कदम यांचं ट्वीट


सांगलीत चोर समजून साधूंना मारहाण झाल्याच्या घटनेनंतर भाजपचे आमदार राम कदम यांनी ट्वीट करत या प्रकरणात अन्याय होणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. पालघर साधू हत्याकांडाची आठवण करून देत त्यांनी तत्कालीन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. पालघर साधू हत्याकांडात तत्कालीन सरकारनं अन्याय केला, तसा अन्याय विद्यमान सरकार करणार नाही, दोषींना कठोर शिक्षा मिळेल, असं कदम यांनी म्हटलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Sangli News : मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून 4 साधूंना बेदम मारहाण, सांगलीतील जत तालुक्यातील घटना