Mohammad Siraj: काउंटी क्रिकेटच्या (County Cricket) पदार्पणाच्या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनं (Mohammed Siraj) दमदार प्रदर्शन केलंय. काउंटी क्रिकेटमधील पहिला सामन्यात मोहम्मद सिराजनं वारविकशायरकडून (Warwickshire) खेळताना सॉमरसेटविरुद्ध (Somerset) 5 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजच्या घातक गोलंदाजीमुळं सॉमरसेट संघ पहिल्या डावात अवघ्या 219 धावांवर ढेपाळला. 


सॉमरसेटविरुद्ध सामन्यात मोहम्मद सिराजनं 24 षटकं टाकली. ज्यात 82 धावा देऊन पाच विकेट्स घेतल्या. त्यानं पाकिस्तानच्या इमाम उल हकच्या रुपात काऊंटी क्रिकेटमधील पहिला विकेट्स मिळवला. त्यानंतर जॉर्ज बार्टलेट आणि जेम्स रेव्हला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.सॉमरसेटसाठी 60 धावांची खेळी करणारा लुईस ग्रेगरीही मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीचा शिकार ठरला. त्यानंतर जोश डेव्हीला बाद करून त्यानं काउंटी क्रिकेटच्या पदार्पणाच्या सामन्यात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केलाय. 


मोहम्मद आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्द
मोहम्मद सिराजने भारतासाठी आतापर्यंत 13 आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यात 30.77 च्या सरासरीनं त्यानं 40 विकेट्स घेतल्या आहेत. मोहम्मद सिराजनं आतापर्यंत कसोटी सामन्यात एका डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटीत 73 धावांत 5 खेळाडूंना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता.


टी-20 विश्वचषकात मोहम्मद सिराजला संघात स्थान नाही
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीय. या स्पर्धेत रोहित शर्मा भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी संभाळणार आहे. तर, केएल राहुलला उपकर्णधारपद देण्यात आलंय.वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांचे भारतीय संघात पुनरागमन झालंय. तर आशिया चषक 2022 मध्ये चमकदार कामगिरी करणारा युवा गोलंदाज अर्शदीप सिंहलाही संघात स्थान मिळालंय. महत्वाचं म्हणजे, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज आणि श्रेयस अय्यर या खेळाडूंना या संघात स्थान मिळालेलं नाही. मात्र, मोहम्मद शामी आणि श्रेयस अय्यर राखीव खेळाडू म्हणून संघासह ऑस्ट्रेलियाला जाणार आहेत.


टी-20 विश्वचषक 2022 साठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, यूजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भूवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.
राखीव खेळाडू- मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्य


हे देखील वाचा-