Maharashtra Rajbhavan SRPF Constable News: SRPF कौस्तुभ सांगळेने लोकभवनात स्वत:ला संपवलं; आता धक्कादायक कारण आलं समोर, पोलीसही चक्रावले!
Maharashtra Rajbhavan SRPF Constable News: महाराष्ट्र राजभवनात एका राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाने स्वतःवर गोळी झाडून आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली.

Maharashtra Rajbhavan SRPF Constable News: महाराष्ट्र राजभवनात एका राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाने स्वतःवर गोळी झाडून आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना काल घडली. कोल्हापूर येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) गट-16 मधील कॉन्स्टेबल कौस्तुभ सांगळे (Kaustubh Sangle) याने कर्तव्यावर असताना स्वतःच्या सर्व्हिस एसएलआर (SLR) रायफलने गोळी झाडून आत्महत्या केली. कौस्तुभ सांगळेच्या आत्महत्येमागील नेमकं कारण काय, याचा तपास पोलीस अधिक वेगाने करत आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. (Rajbhavan SRPF Constable Marathi News)
सूत्रांच्या माहितीनुसार, तपासादरम्यान प्रेमसंबंधांचा पैलूही समोर आला आहे. कौस्तुभ यांचे मीरा-भाईंदर पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध होते, असे समजते. ते दोघे बऱ्याच काळापासून एकमेकांच्या संपर्कात होते आणि त्यांच्यात लग्नाबाबतही चर्चा झाली होती. मात्र, नंतर त्या महिला कॉन्स्टेबलने लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर, तिच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या एका पोलीस कॉन्स्टेबलशी निश्चित केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घडामोडीनंतर कौस्तुभ तीव्र मानसिक तणावाखाली गेला होता. महिला कॉन्स्टेबलचे लग्न ठरल्यानंतर, कौस्तुभने कथितरीत्या त्या महिलेसोबतचे त्याचे काही खाजगी फोटो तिच्या होणाऱ्या पतीला पाठवले होते. हे फोटो पाठवण्यामागचा त्याचा उद्देश काय होता आणि या कृतीमुळे संबंधित पक्षांमध्ये काही वाद निर्माण झाला होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. (Rajbhavan SRPF Constable News)
महिला कॉन्स्टेबलने कौस्तुभबाबत आधीच भाईंदर पोलिसांना दिली होती कल्पना- (Kaustubh Sangle Marathi News)
कौस्तुभने संबंधित महिला कॉन्स्टेबलला वारंवार फोन करून आत्महत्येची धमकी दिली होती. कौस्तुभ असे पाऊल उचलण्याची शक्यता आहे, याची कल्पना त्या महिला कॉन्स्टेबलने यापूर्वीच भाईंदर पोलिसांना दिली होती, असे समजते. ही माहिती मिळाल्यानंतर काय कारवाई करण्यात आली, वरिष्ठ अधिकाऱ्यांना परिस्थितीची कल्पना दिली गेली होती का, आणि त्याला कोणत्याही टप्प्यावर समुपदेशन किंवा इतर प्रकारची मदत दिली गेली होती का, याचा शोध आता तपास यंत्रणा घेत आहेत. तसेच कौस्तुभच्या कौटुंबिक परिस्थितीबाबतही काही तपशील समोर आले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो लहान असतानाच त्याच्या आईचे निधन झाले होते आणि त्यानंतर त्याच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते. त्याला दोन बहिणी होत्या; त्यापैकी एका बहिणीने काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती, तर दुसरी विवाहित आहे. कौस्तुभची कौटुंबिक परिस्थिती आणि अलीकडील घटनांचा त्याच्या मानसिक आरोग्यावर काही परिणाम झाला होता का, याचाही तपास पोलीस करत आहेत.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:






















