मुंबई : कांदिवली रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेनमध्ये चढताना एका प्रवाशाचा मोबाईल खेचणाऱ्या चोरट्याला दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी फिल्मी स्टाईल पाठलाग करून अटक केली. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरानं टिपली आहे. ताहिर सय्यद असं त्या चोरट्याचं नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. कांदिवली पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राजेश गावकर आणि पोलीस शिपाई योगेश हिरेमठ यांनी प्रसंगावधान राखून त्याला जेरबंद केलं.  


कांदिवली रेल्वे स्थानकावर असलेल्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा मोबाईल खेचून पळून जात असलेल्या चोरट्याला कांदिवली पोलिसांच्या दोन जवानांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करत पकडले आहे.  ही घटना काल रात्री 11 वाजून 50 मिनिटाची आहे.  दोन्ही पोलीस कर्मचारी घरी जाण्यासाठी कांदिवली रेल्वे स्टेशनवर आले होते. त्याचवेळी त्यांच्या समोर या चोरट्यांनी एका प्रवासाचा मोबाईल चोरी करून पळून जात होता. या पोलिसांनी पाठलाग करून प्लॅटफॉर्मवरून पटरीवर आणि रेल्वे पटरीवरून पुन्हा प्लॅटफॉर्मवर फिल्मी स्टाईलने पळत असताना या दोन्ही पोलिसांनी त्याला पकडले आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.


  या आरोपीला बोरीवली रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. अटक आरोपीचे नाव ताहिर मुस्तफा सय्यद वय 25 वर्षे आहे.  हा आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.  कांदिवली पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राजेश गावकर व पोलीस शिपाई योगेश  हिरेमठ यांनी वेळीच प्रसंगावधान राखत त्याचा पाठलाग करून  सदर आरोपीस पकडून मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यामुळे सर्व ठिकाणी त्यांचे कौतुक केले जात आहे.