एक्स्प्लोर

लग्न करायचे नव्हते म्हणून दोन मावस बहिणींची आत्महत्या, एकाच साडीने घेतला गळफास; लातूरमधील घटना

दोन मावस बहिणींनी एकाच साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर येथे घडली आहे.

लातूर : दोन मावस बहिणींनी एकाच साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर येथे घडली आहे. आत्महत्या केल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.  आत्महत्यास प्रवृत केल्याप्रकरणी एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले आहे. 

धनश्री संतराम क्षीरसागर (वय 19, कानेगाव ता. लोहरा जि. उस्मानाबाद) आणि तिची  मावस बहिण गीतांजली बनसोडे (वय 17 ) अशी या मृत बहिणींची नावे आहेत.  या दोघींचा मृतदेह आज सकाळी घरात आढळून आला. गीतांजलीच्या हरगुळ येथील घरात एकाच साडीने दोघींनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. या बाबत एमआईडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे. या प्रकरणात एका व्यक्तिस आत्महत्येस प्रवृत केल्याच्या कारणावरुन ताब्यात घेण्यात आले आहे. 

धनश्री ही बारावी पास होती तर गीतांजली ही बारावीत होती. घरात याच्या लग्नाचा विषय सुरु होता. 'आम्हाला आताच लग्न करायचे नाही',  असा हट्ट त्यांनी धरला होता. दरम्यान याच काळात त्याच्या मनात घरातून पळून जाण्याचा विचार आल.  17 जूनला या मुली पुण्याला घरातून न सांगता गेल्या होत्या. हरंगुळ येथील पंकज सुतार या इसमाने या बहिणींना फूस लावल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे.  21 जूनला  एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल होता. या  दोन्ही मुलींना 1 जुलैला लातुरला परत आणले गेले होते. त्या दिवसांपासून त्या त्रस्त होत्या.  आज सकाळी घरात त्याचे मृतदेह आढळून आले. नातेवाईक यामुळे हादरुन गेले आहेत. पंकज सुतार यास एमआयडिसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. 

या प्रकरणी 'तात्काळ कारवाई करा...गुन्हा दाखल करा..आरोपीस अटक करा' अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. घटनेनंतर नातेवाईक चांगलेच आक्रमक झाले होते. पोलिसांनी  शवविच्छेदन आहवाल  आल्यावर सगळे चित्र स्पष्ठ होईल असे सांगितल्यानंतरही नातेवाईक शांत होत नव्हते.  या वेळी मुलीचा मामा एमआयडिसी पोलिस ठाण्याच्या लोखंडी कमानीवर चढला तेथून खाली पडल्यामुळे हाताला जबर मार लागला.  शवविच्छेदन अहवाल आल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी पंकज सुतार पोलिसांच्या ताब्यात आहे. यानंतर नातेवाईकांचा आक्रोश कमी झाला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai News: खबरीनं पोलिसांना टीप दिली, मुंबईतील क्लिनिक, 4 वर्षांपासून फ्रिजमध्ये ठेवलेला मृतदेह अन्..., परिवारानं सांगितलं कारण, घटनेबाबत चक्रावणारी माहिती समोर
खबरीनं पोलिसांना टीप दिली, मुंबईतील क्लिनिक, 4 वर्षांपासून फ्रिजमध्ये ठेवलेला मृतदेह अन्..., परिवारानं सांगितलं कारण, घटनेबाबत चक्रावणारी माहिती समोर
Pradeep Purnekar Death Case मित्रानेच काटा काढला, गोळीबारानंतर रुग्णालयातही घेऊन गेला; प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणात नवा अँगल
मित्रानेच काटा काढला, गोळीबारानंतर रुग्णालयातही घेऊन गेला; प्रदीप पूर्णेकरांच्या हत्याप्रकरणात नवा अँगल
Shivsena UBT Pradeep Purnekar Death Case: ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांना 5 जणांनी संपवलं; आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले...
ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकरांना 5 जणांनी संपवलं; आदित्य ठाकरे संतापले, म्हणाले...
Plane Hijack: विमानात वाद अन् दाबला गेला हायजॅकिंगचा कोड! अलर्टने इस्रायल-सौदीत उडाली धावपळ, फ्लाय दुबईच्या विमानात नेमकं काय घडलं? तासाभराच्या थरारानंतर अखेर सत्य समोर
विमानात वाद अन् दाबला गेला हायजॅकिंगचा कोड! अलर्टने इस्रायल-सौदीत उडाली धावपळ, फ्लाय दुबईच्या विमानात नेमकं काय घडलं? तासाभराच्या थरारानंतर अखेर सत्य समोर

व्हिडीओ

Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha
Raj Thackeray Rahul Gandhi : राज-राहुल संपर्क? चर्चेत राऊतांचा तर्क Special Report
Chakan MIDC : चाकणला 1400 कोटी मिळाले, उद्योजकांनी आभार मानले
Sanjay Raut on FDA Tukaram Mundhe : धाड मुंढेंची, कमाई अधिकाऱ्यांची?राऊतांच्या पत्राने खळबळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai News: खबरीनं पोलिसांना टीप दिली, मुंबईतील क्लिनिक, 4 वर्षांपासून फ्रिजमध्ये ठेवलेला मृतदेह अन्..., परिवारानं सांगितलं कारण, घटनेबाबत चक्रावणारी माहिती समोर
खबरीनं पोलिसांना टीप दिली, मुंबईतील क्लिनिक, 4 वर्षांपासून फ्रिजमध्ये ठेवलेला मृतदेह अन्..., परिवारानं सांगितलं कारण, घटनेबाबत चक्रावणारी माहिती समोर
तब्बल 3 हजार कोटींच्या अंमली पदार्थांसह 5 पाकिस्तानींच्या मुसक्या आवळल्या; इराणी बोटीतून मुबंईत येताना लक्षद्वीपजवळ तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने पकडलं
तब्बल 3 हजार कोटींच्या अंमली पदार्थांसह 5 पाकिस्तानींच्या मुसक्या आवळल्या; इराणी बोटीतून मुबंईत येताना लक्षद्वीपजवळ तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने पकडलं
Rule Change: एलपीजी,मुदत ठेव, एटीएम ते यूपीआय ऑक्टोबरमध्ये 7 नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या  
एलपीजी,मुदत ठेव, एटीएम ते यूपीआय ऑक्टोबरमध्ये 7 नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या  
ज्ञानेश कुमार चोर आणि दरोडेखोर, मतचोरी केली, ईव्हीएम मशीन जाळल्या, हॅक केल्या; 'जर तत्काळ ज्ञानेशकुमारांनी राजीनामा नाही दिला, तर..' ममता बॅनर्जींचा रुद्रावतार!
ज्ञानेश कुमार चोर आणि दरोडेखोर, मतचोरी केली, ईव्हीएम मशीन जाळल्या, हॅक केल्या; 'जर तत्काळ ज्ञानेशकुमारांनी राजीनामा नाही दिला, तर..' ममता बॅनर्जींचा रुद्रावतार!
कळसूत्री बाहुल्यांचे मोदी शाहाच सूत्रधार, तेच मतचोरी करून निवडणूक जिंकत आहेत; देशव्यापी मोर्चे ते निवडणूक आयोगावर भव्य मोर्चा, इंडिया आघाडीने निर्णायक रणशिंग फुंकलं!
कळसूत्री बाहुल्यांचे मोदी शाहाच सूत्रधार, तेच मतचोरी करून निवडणूक जिंकत आहेत; देशव्यापी मोर्चे ते निवडणूक आयोगावर भव्य मोर्चा, इंडिया आघाडीने निर्णायक रणशिंग फुंकलं!
सांगली बँकेच्या निवडणुकांसाठी गोपीचंद पडळकरांचा अर्ज, जयंत पाटलांविरुद्ध घोषणाबाजी; कार्यालयात तणाव
सांगली बँकेच्या निवडणुकांसाठी गोपीचंद पडळकरांचा अर्ज, जयंत पाटलांविरुद्ध घोषणाबाजी; कार्यालयात तणाव
Supreme Court on Firecracker Verdict: मोठी बातमी! फटाक्यांवरील देशव्यापी बंदीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे निरीक्षण; म्हणाले, पूर्णपणे बंदी घालता येणार नाही, पण...
मोठी बातमी! फटाक्यांवरील देशव्यापी बंदीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे निरीक्षण; म्हणाले, पूर्णपणे बंदी घालता येणार नाही, पण...
Gold Silver Rate: आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचे दरही कोसळले, दोन दिवसांमध्ये 'इतक्या' हजारांनी झाले कमी, जाणून घ्या आजचे दर
आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीचे दरही कोसळले, दोन दिवसांमध्ये 'इतक्या' हजारांनी झाले कमी, जाणून घ्या आजचे दर
Embed widget