Kalyan Crime News :  उल्हासनगरमध्ये (UlhasNagar Crime News) भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्याकडून गोळीबार करण्यात आला आहे. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये गोळीबार  झाला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार केलाय. दरम्यान ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात महेश गायकवाड यांच्यावर उपचार सुरु आहेत.


 कल्याणचे शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी महेश गायकवाड यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. दरम्यान कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर  मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.  भाजपच्या गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या होत्या. सध्या महेश गायकवाड यांची प्रकृती स्थिर आहे.


पोलीस स्टेशनमध्ये केलेले कृत्य घृणास्पद


कल्याण  शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश गायकवाड यांच्यावरती सहा गोळ्या झाडल्या होत्या. त्या गोळ्या काढण्यामध्ये डॉक्टर यशस्वी झाले आहे. एका लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अशाप्रकारे कृत्य केलं हे घृणास्पद आहे. त्यांचं मी निषेध करतो. जो कांगावा केला जातो,  मुलाला मारलं वगैरे ते साफ खोटं आहे. तिकडचे लोक सांगत आहे की अशाप्रकारे काही झालेला नाही.


सत्य आहे ते बाहेर येणारच : गोपाळ लांडगे


सत्य आहे ते बाहेर येणारच आहे. या गोष्टीचा निषेध करावा तितकं कमीच आहे. निश्चितपणे या लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्रामध्ये हा कलंक आहे. अशाप्रकारे कृती कधी घडलं नाही, त्याचा आम्ही निषेध करतो. दोघांची प्रकृती स्थिर आहे. आपण सुद्धा गुन्हा करायचा आणि त्यावर आपण आरोप करायचे.याचा काही उपयोग नाही.ज्यांनी गुन्हा केलाय ते उच्च पद सदस्य आहे.  त्यांनी स्वतःचा बचाव करताना दुसऱ्यांवर किती आरोप केले.. तरी ते खोटे आरोप आहे ते कधी सिद्ध होऊ शकणार नाही.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीमध्ये सर्व महाराष्ट्र आणि त्यांना सगळे ओळखतात.


जमिनीच्या वादातून गोळीबार?


मिळालेल्या माहितीनुसार, एका 50 गुंठे जमिनीचा वाद सुरू होता. मागील तीन दिवसांपासून हे प्रकरण सुरू होते. शुक्रवारी गणपत गायकवाड यांच्या मुलांसोबत पोलीस स्टेशनमध्ये वाद सुरु असताना गणपत गायकवाड यांनी  येऊन पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. 



हे ही वाचा :


Nanded Crime News : आंतरजातीय प्रेम जुळलं, समाजातील बदनामीच्या भीतीने आई-वडिलांनीच लेकीला संपवलं