Numerology Today 3 February 2024 : अंकशास्त्र (Numerology) देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याबद्दल सांगते. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मूलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं आहे, यात गणिताचे नियम वापरुन तुमच्या भविष्याबद्दल सांगितलं जातं.


मूलांक ही जन्मतारीख असते. जर तुमचा जन्म 7 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 7 असेल. परंतु जर तुमचा जन्म 17 किंवा 26 किंवा अशाच दोन सांख्यिक तारखेला झाला असेल, तर तुमचा मूलांक 1+7 = 8, 2+6 = 8 असा काढला जातो. जर एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 29 असेल, तर 2+9 = 11, 1+1 = 2 असेल, तर व्यक्तीचा मूलांक 2 असेल.


आता तुम्हाला तुमचा मुलांक तर मिळालाच असेल, याद्वारे तुमचा आजचा दिवस कसा जाईल? याबाबत जाणून घेऊया.


मूलांक 1


कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 1 असतो. मूलांक 1 असलेल्या लोकांची प्रकृती आज ठीक नसेल, तुम्हाला बरं व्हायला थोडा वेळ लागू शकतो. तुमचं उत्पन्न कमी झाल्यामुळे तुम्ही पैशाशी संबंधित चिंतेत देखील असाल, त्यामुळे तुम्हाला यावर थोडं लक्ष द्यावं लागेल.


मूलांक 2


कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 2 असतो. जर तुम्ही परदेशात शिक्षण घेण्याची तयारी करत असाल तर तुम्हाला लाखो प्रयत्नांनंतर यश मिळेल, म्हणून प्रयत्न करत राहा. आज तुम्ही तुमच्या एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता.


मूलांक 3


कोणत्याही महिन्याच्या 3,12, 21, 30 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 3 असतो. मूलांक 3 च्या लोकांचं मन आज अशांत राहील. मानसिक ताण वाढू शकतो. कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. कामात एखादी अडचण येऊ शकते. आजचा दिवस खर्चिक असेल.


मूलांक 4


कोणत्याही महिन्याच्या 4,13, 22, 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. आज मूलांक 4 असलेले व्यक्ती एखाद्या कारणामुळे निराश होतील. आज कमी बोलण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला कुटुंबाचं सहकार्य लाभेल. धार्मिक कार्यक्रमात तुमचा सहभाग असेल.


मूलांक 5


कोणत्याही महिन्याच्या 5,14, 23 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 5 असतो. मालमत्तेचे कोणत्याही प्रकरणाचा निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. 4 मूलांकाचे विद्यार्थी आज अभ्यासात चांगली कामगिरी करतील आणि त्यांचा नावलौकिक वाढवतील. आज तुम्हाला एखादी चांगली व्यक्ती भेटेल, त्या व्यक्तीशी तुम्ही मन भरुन बोलू शकता.


मूलांक 6


कोणत्याही महिन्याच्या 6,15, 24 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 6 असतो. काही लोक आज नातेवाईकांना भेटण्यासाठी शहराबाहेर जाऊ शकतात. मालमत्तेशी संबंधित कोणत्याही गोष्टींना आज हात लावू नका. आज तुमचा दिवस खर्चिक असेल, त्यामुळे अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा.


मूलांक 7


कोणत्याही महिन्याच्या 7,16, 25 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 7 असतो. आज मूलांक 7 असलेले लोक लाँग ड्राइव्हवर जाऊ शकतात, यामुळे तुमच्यामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. वैयक्तिक बाबीबाबत तुमचा विचार बदलावा लागेल, हे अवघड आहे, पण अशक्य नाही. शैक्षणिक आघाडीवर पुढे जाण्यासाठी अडथळे दूर करणे ही काळाची गरज आहे.


मूलांक 8


कोणत्याही महिन्याच्या 8,17, 26 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 8 असतो. मूलांक 8 च्या लोकांना आज आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. जर तुम्ही कोणाकडून कर्ज घेतले असेल तर तुम्ही ते परत कराल. आज तुम्ही कोणत्याही कौटुंबिक विषयाचा अनावश्यक ताण घेऊ शकता. समाजात मान-सन्मान मिळेल.


मूलांक 9


कोणत्याही महिन्याच्या 9,18, 27 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 9 असतो. आज तुमच्यावरील कामाच्या जबाबदाऱ्या वाढतील. व्यवसायात आर्थिक लाभाच्या नवीन संधी मिळतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.आर्थिक स्थिती सुधारेल आणि शैक्षणिक कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा : 


Budh Asta 2024 : फेब्रुवारीपासूनचा एक महिना समस्यांचा; बुध अस्तामुळे 'या' राशीच्या लोकांना सोसावं लागणार नुकसान