नांदेड : समाजात होत असलेल्या बदनामीच्या भीतीने आई वडिलांनीच पोटच्या मुलीवर विळ्याने वार करुन तिचा जीव घेतला. ही घटना नांदेड जिल्ह्यातील (Nanded) हिमायतनगर शहरातील नेहरू नगर भागात शुक्रवार 2 फेब्रुवारी रोजी घडली. यांदर्सभात हिमायतनगर पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अंकिता रामराव पवार वय 17 असं या मुलीचं नाव आहे. या घटनेनंतर नांदेड एलसीबीचे पथक आणि धर्माबाद येथील धर्माबाद चे उपविभागीय अधिकारी व भोकर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
हिमायतनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील नेहरूनगर भागात पवार कुटुंब राहत आहे. या कुटुंबातील मुलीचे त्यांच्याच परिसरातील एका युवकाशी प्रेमसंबंध होते. हा प्रकार तिच्या घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर तिच्या घरच्यांनी त्या मुलापासून लांब राहण्यास सांगितले. तसेच मुलगा दुसऱ्या जातीचा असल्याने कुटुंबियांना तिचे हे प्रेमसंबंध मान्य नव्हते. तरीदेखील मागील महिन्याभरापूर्वी ती प्रेम करणाऱ्या मुलासोबत पळून गेली होती.
युवकावर गुन्हा दाखल
मुलगी पळून त्यानंतर तिच्या घरच्यांनी हिमायतनग पोलीस स्थानकात पोस्को अंतर्गत प्रेम करणाऱ्या युवकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुलीला समजावून तिच्या पालकांच्या स्वाधीन केले होते. मात्र तरीही मुलीच्या वागण्यात काही सुधारणा झाली नाही, पुन्हा ती पळू गेली. त्या मुलासोबत लग्न करण्याचा तिने हट्ट केला होता.
मुलीच्या वागण्याला कंटाळून पालकांचं टोकाचं पाऊल
मुलीच्या आई-वडिलांनी तिच्या वागण्याला कंटाळून, समाजात होत असलेल्या बदनामीच्या भीतीने मुलीचा जीव घेतला. अंकिता मध्यरात्री गाढ झोपेत असताना तिच्या डोक्यावर विळ्याने वार केले. यामध्ये त्या मुलीचा जीव गेला. हा हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी मयत मुलीचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणून शवविच्छेदनास पाठवला. तसेच मुलीच्या हत्येप्रकरणी आई वडिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी यांनी दिली. मुलीच्या पालकांवर हत्येप्रकरणी कलम 302 अंतर्गत आरोपी पंचफुलाबाई रामराव पवार आणि रामराव पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी आणि त्यांचे सहकारी करत आहते. तसेच धर्माबादचे उपविभागीय अधिकारी संपते आणि पीएसआय पाटील भोकर यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. या गुन्ह्याचा तपास एलसीबी पथकाचे पीएसआय मुंडे मैसनवाड, सुरेश घुगे, तानाजी येळगे, शंकर केंद्रे यांनी देखील केला.