एक्स्प्लोर

Crime News : रेल्वेत चोरट्यांचा धुमाकूळ, पाच महिलांचे दागिने लांबवले

रेल्वे क्रॉसिंगसाठी शिर्डी एक्सप्रेस थांबली होती. शिर्डी-सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घातला.

 बीड : प्रवासी झोपेत असल्याची संधी साधत रेल्वे क्रॉसिंगवर चोरट्यांनी धुमाकूळ घालत पाच महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हातोहात लांबवले. आज परळी गंगाखेड रेल्वेमार्गावर पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. 

रेल्वे क्रॉसिंगसाठी शिर्डी एक्सप्रेस थांबली होती. शिर्डी-सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घातला. परळी-परभणी मार्गावरील वडगाव स्टेशन येथे रेल्वे क्रॉसिंगच्या दरम्यान रेल्वे थांबली होती. या  दरम्यान खिडकीतून हात घालत पाच महिला प्रवाशांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पलायन केले. दरम्यान गंगाखेड रेल्वे मार्गावर असलेल्या वडगाव निळा येथील रेल्वेची क्रॉसिंग असल्याने शिर्डी-सिकंदराबाद रेल्वे काही मिनिटे थांबली होती.

 ही संधी साधत चोरट्यांनी खिडकीतून महिला प्रवाशांच्या गळ्यातील दागिने ओरबाडून नेले. ही माहिती औरंगाबादहून उदगीरकडे प्रवास करणारे श्रीनिवास सोनी यांनी दिली. कमलनगर (जि.बिदर) येथील एका महिलेच्या गळ्यातील 45 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र, शिर्डी-सिकंदराबाद रेल्वेतून चोरीस गेले आहे. या प्रकरणी महिलेच्या पतीने उदगीर येथील रेल्वे पोलीस चौकीत फिर्याद दिली आहे.या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध परळी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

या रेल्वे मार्गावर चोरीच्या घटना घडण्याची घटना तशी काही नवीन नाही मात्र मागच्या काही दिवसापासून रेल्वे पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली होती. त्यामुळे काही अंशी अशा चोऱ्यांच्या प्रमाणाला ब्रेक सुद्धा लागला होता.

प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

 या घटनेवरून पुन्हा एकदा रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी घटनास्थळी येऊन पंचनामा करत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान घटनास्थळी रेल्वे पोलीस परळी व आरसीबीच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी भेट देऊन पाहणी केली

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Parbhani Crime: मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात
मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात
Nashik Ashram School : मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 
मुले फरशीवर झोपतात, तिथेच अभ्यास, रात्रीच्या अंधारात कपडे धुवावे लागतात; नाशिकच्या आश्रमशाळेची स्थिती, लाखोंचा निधी कुठे जातोय? 

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Embed widget