Jalgaon Crime News : झेरॉक्स मशीनचा वापर करीत अगदी हुबेहूब वाटणाऱ्या बनावट नोटा तयार करून वितरित करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे, तसेच त्याच्या कडून काही नकली नोटाही जप्त करण्यात आल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात हा प्रकार समोर आला आहे. घडलेला प्रकार पाहून पोलिसही चक्रावले असून जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

  
  


पोलिसी खाक्या दाखवताच सांगितली हकीकत


जळगाव जिल्ह्यातील जामनेर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पहूर बस स्थानक परिसरात पोलिस गस्त घालीत असताना एक संशयास्पद तरुण या ठिकाणी आढळून आला होता. या तरुणाला पोलिस कर्मचाऱ्यांनी हटकले असता तो उडवा उडवीची उत्तर देत असल्याचं लक्षात आल्यावर पोलिसांनी त्याची झडती घेतली, यावेळी त्याच्या खिशात दोनशे रुपयांच्या काही बनावट नोटा आढळून आल्या. पोलिसांनी त्याला पोलिस ठाण्यात नेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्याने प्रिंटरच्या साहायाने नकली नोटा तयार करून त्या वितरित करीत असल्याचा खुलासा पोलिसांकडे केला.


नकली नोटा छापणारे प्रिंटर सापडले
उमेश राजपूत नावाच्या या तरुणाने ही माहिती दिली असून पोलिसांनी त्याच्या हिंगणे गावी जाऊन घराची झडती घेतली असता त्या ठिकाणी नकली नोटा छापण्यासाठी लागणारे प्रिंटर आणि दोनशेच्या अनेक नकली नोटा आढळून आल्या. यावेळी पोलिसांनी उमेश राजपूतसह नोटा बनवण्यासाठी लागणारे साहित्यही जप्त केले. नकली नोटा बनविल्या प्रकरणी उमेश राजपूत याच्या विरोधात पहुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तरुणाने दाखविले नोटा बनविण्याचे प्रात्यक्षिक


या घटनेत पोलिसांनी उमेश राजपूत या तरूणाला अटक केली असून त्याच्या या कृत्यामध्ये आणखी कोण सहभागी आहेत याचा तपास आता पोलिस करीत आहेत. आरोपी उमेश राजपूत याच्याकडून नकली नोटा बनविण्याची माहिती घेत असताना त्याने झेरॉक्स मशीनचा वापर करून दोनशे आणि पाचशे रुपयांच्या नोटा बनविण्याचे प्रात्यक्षिकच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना करून दाखवल्याने उपस्थित अधिकारी आणि कर्मचारीही चांगलेच विचारात पडले असल्याचं पाहायला मिळाले.


महत्वाच्या इतर बातम्या


Beed Crime News : भाच्याचा मामीवर जडला जीव; दोघांनी डाव आखून केली मामाची हत्या!


Pune Crime: संतापजनक! मोबाईलवर अश्लील व्हिडीयो दाखवून केला अत्याचार, नराधमाला 20 वर्षांंची सक्तमजुरी