SBI ATM Cash Withdrawal Rule :  देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी नवा नियम लागू केला आहे. एटीएममधून पैसे काढण्यासाठीचा नियम एसबीआयने बदलला आहे. रोख रक्कमेचा व्यवहार ( SBI Cash Transaction) अधिक सुरक्षित करण्यासाठी हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. एटीएममधून पैसे काढण्यासाठी ओटीपी नमूद करणे अनिवार्य करण्यात आले आहे. 


एसबीआयच्या ग्राहकांना एटीएममधून पैसे काढण्यासाठी ओटीपी नमूद करावा लागणार आहे. ओटीपीशिवाय एटीएममधून पैसे काढता येणार नाही. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. 


स्टेट बँक ऑफ इंडियाने या नव्या नियमांबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. ओटीपीचा वापर करून सायबर गुन्हेगारीविरोधात पाऊल असल्याचे बँकेने म्हटले. 


 






ग्राहकांना सायबर गुन्हेगारांपासून संरक्षण देणे ही आमची प्राथमिकता असल्याचे एसबीआयने म्हटले. ग्राहकाला 10 हजारांहून अधिक रक्कम एटीएममधून काढायची असल्यास  त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल. त्यानंतर ओटीपी आणि पीन क्रमांक नमूद करावा लागणार आहे. त्यानंतर ग्राहकाला एटीएममधून पैसे काढता येणार आहे. 


>> एसबीआयच्या एटीएममधून पैसे नवीन काढण्याची पद्धत


> एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी पहिल्यांदा एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकावे.


> ओटीपी पर्यायावर क्लिक करा.


> तुमच्या Registered Mobile वर ओटीपी क्रमांक येईल. त्याची नोंद करा


> त्यानंतर एटीएम पिन क्रमांक नमूद करा 


> ओटीपी आणि पिन क्रमांक नमूद केल्यानंतर तुम्हाला रक्कम काढता येईल