एक्स्प्लोर

MP Crime : धक्कादायक! लग्नासाठी हट्ट धरला म्हणून प्रियकराची प्रेयसीला बेदम मारहाण, व्हिडीओ होतोय व्हायरल

Madhya Pradesh Man Beat Up Girlfriend : लग्नासाठी हट्ट धरला म्हणून प्रियकराने प्रेयसीला बेदम मारहाण केली आहे. मध्य प्रदेशमधील रीवा जिल्ह्यामधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Man Beat Up Girlfriend Video Viral : लग्नासाठी हट्ट धरला म्हणून प्रियकराने प्रेयसीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सध्या सोशल मीडियावर हा धक्कादायक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील वास्तव एवढे भीषण आहे की, हा व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहीला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण एका तरुणीना बेदम मारहाण करताना दिसत आहे. तरुणाने पीडितेला कानाखाली मारली, त्यानंतर जमिनीवर आपटून लाथेनेही बेदम मारहाण केली आहे. 

लग्नासाठी हट्ट धरला म्हणून प्रियकराची प्रेयसीला बेदम मारहाण

मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रेयकरानेच चक्क प्रेयसीला बेदम मारहाण केली आहे. यामध्ये प्रेयसीची चूक फक्त एवढीच होती की, तिने प्रियकराकडे लग्नाचा हट्ट धरला. प्रेयसीने लग्न कधी करणार असं विचारलं म्हणून प्रियकराने प्रेयसीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. मारहाणीनंतर तरुणी बेशुद्ध पडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून प्रचंड चर्चेत आहे. 

आरोपी प्रियकर फरार

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, ही तरुणी 19 वर्षांची आहे. ही घटना बुधवारी घडल्याची माहिती आहे. आरोपी तरुणाला शांतता भंग केल्याच्या आरोपावरून आधी ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याचा गुन्हा फार मोठा नव्हता, त्यामुळे त्याची नंतर सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, तरुणीला मारहाण केल्याचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणावर भादंवि कलम 323 सह इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपी तरुण सध्या फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर मिळाल्यानंतर व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील मौगंज येथील ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी घडली आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये प्रियकर आणि प्रेयसी एका निर्जन ठिकाणी उभे असलेले दिसत आहे. या दोघांचा समोरून कोणीतरी व्यक्ती व्हिडीओ बनवत असल्याचं दिसत आहे. व्हिडीओतील आरोपी तरुणाचं नाव पंकज असल्याची प्राथमिक माहिती आहे. तरुण व्हिडीओ बनवण्यास सांगत असल्याचे स्पष्टपणे ऐकू येत आहे. त्यानंतर प्रेयसी प्रियकराला लग्न करण्याबाबत विचारणा करत असल्याचं ऐकू येत आहे.

तरुणीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

यानंतर प्रियकरामधील हैवान समोर येतो. प्रियकर व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीला रेकॉर्डींग बंद करायला सांगतो. त्यानंतर आरोपी तरुण प्रेयसीच्या जोरात कानाखाली मारतो, त्यानंतर तो तिला जमिनीवर फेकतो आणि तिच्या पायाला लाथ मारतो. एवढ्यावरही त्याचे समाधान होत नाही, त्यानंतर तो निर्दयीपणे तरुणीच्या तोंडावर जोरात लाथा मारतो. यादरम्यान, प्रेयसीच्या तोंडातून पुन्हा लग्न हा शब्द ऐकल्यावर त्याचा राग अनावर होतो आणि तो जोरजोरात तरुणीच्या चेहऱ्यावर लाथ मारून तिला शिवीगाळ करतो. बेदम मारहाणीमुळे मुलगी बेशुद्ध झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara Crime News:'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
Mumbai Crime Sion Hospital: सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
Delhi CJP Protest : दिल्लीतील CJPच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; कथित 'हिंदू रक्षा दला'शी संबंधित चौघांना अटक
दिल्लीतील CJPच्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; कथित 'हिंदू रक्षा दला'शी संबंधित चौघांना अटक
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये संतापजनक प्रकार; चालकाला पत्ताच नाही, धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण थेट स्ट्रेचरसह रस्त्यावर पडला अन्...

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Mukul Wasnik: कालपर्यंत ज्यांनी विविध राजकीय पक्षांना फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता स्वतःचे खासदार शाबूत ठेवावे लागतील: मुकुल वासनिक
राजकीय पक्ष फोडणाऱ्यांना स्वत:चे खासदार शाबूत ठेवाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, मुकुल वासनिक यांचा भाजपला टोला  
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
Embed widget