वसई  : व्हॉटसअॅप किंवा इतर कुठल्याही सोशल मीडियावर अनोळखी माणसांवर किंवा प्रोफाईल्सवर विश्वास ठेवणं चांगलंच महागात पडू शकतं. वसईतल्या एका मुलीला देखील या प्रकाराचा चांगलाच मनस्ताप झाला आहे. मात्र पोलिसांच्या जबरदस्त कामगिरीच्या बळावर आरोपीला जेरबंद केलं आहे. व्हॉटसअॅपवर अश्लील फोटो काढून मुलीकडून पैशाची मागणी करणाऱ्या एका भामट्याला वसई पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. या भामट्याने इन्स्टाग्रामवर मुलीच्या नावाने फेक अकाऊंट बनवून प्रसिध्द कंपनीच्या जाहिरातींचं प्रलोभन दाखवून त्यांचे अश्लील फोटो घेतले होते. 


अबू सलीम अन्सारी या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अबूनं सारा वर्मा या मुलीच्या नावाने  इन्स्टाग्रामवर फेक अकाउंट बनवलं होतं. त्यात त्याने प्रोफाईलमध्ये आपण फॅशन मॉडल असल्याचं म्हटलं होतं. इन्स्टाग्रामवर मुलीशी मैत्री केल्यानंतर तो मुलींना एका प्रसिद्ध कंपनीच्या शूजच्या जाहिरातीत काम देण्याचं प्रलोभन दाखवायचा आणि त्यांच्याबरोबर मैत्री करायचा. त्यानंतर व्हॉटसअपवर कॉल करुन त्या मुलींना अंगावरील कपडे काढून, त्यांचे फोटो सेव्ह करायचा. आणि मग ते फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड करण्याची धमकी देत मुलींकडून पैशाची तसेच शरीरसुखाची मागणी करायचा. 


वसईतील एका मुलीच्या तक्रारीवरुन वसई पोलिसांनी अबू अन्सारीवर गुन्हा दाखल केला आहे. वसई पोलिसांनी आपल्या पोलीस ठाण्याचा पोलीस कॉन्स्टेबल सुनील मालवकर यांना कॅबचा ड्रायव्हर बनवून मुलीसोबत पाठवलं आणि त्याला मोठ्या शिताफीने भामट्याला अटक केली आहे. 


आरोपीने अशा प्रकारे जवळपास आठ मुलींना फसवल्याची माहिती मिळत आहे. मात्र फसवलेल्या मुली समोर येत नाहीत. त्यामुळे पोलिसांनी या भामट्याने फसवलेल्या मुलींनी बिनधास्त पोलीस ठाण्यात येवून, याच्याविरोधात तक्रार दाखल करण्याच आवाहन केलं आहे. 



हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha