एक्स्प्लोर

प्रेमाचा त्रिकोण; पतीचा खून तर पत्नी आणि प्रियकराची आत्महत्या

मनातील घालमेल आणि बैचेनी पत्नीला देखील स्वस्थ बसू देत नव्हती त्यामुळे पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर सर्वच प्रकार आपल्या अंगलट येणार या भीतीने प्रियकारानेही आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार खरोळा गावात घडलाय.

लातूर : अनैतिक संबंधामुळे संसाराची कशी राखरांगोळी होती याचे जिवंत उदाहरण रेणापूर तालुक्यातील खरोळा गावात समोर आले आहे. संसार पतीबरोबर आणि अनैतिक संबंध दुसऱ्या बरोबर असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा तर काटा काढल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पण मनातील घालमेल आणि बैचेनी पत्नीला देखील स्वस्थ बसू देत नव्हती त्यामुळे पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर सर्वच प्रकार आपल्या अंगलट येणार या भीतीने प्रियकारानेही आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार खरोळा गावात घडलाय.

सात हजार लोकसंख्या असलेलं खरोळा हे रेणापूर तालुक्यातील गाव. गेल्या 12 दिवसांत या गावात दोघांच्या आत्महत्या तर एका तरुणाचा मृतदेह कोरड्या विहिरीत आढळला होता. मात्र, तपासाअंती प्रेमाचा त्रिकोण आणि तिन्हीही घटनेमागील सत्य समोर आले आहे. लखन राऊतराव आणि त्याची पत्नी मनीषा हे गावातच एकत्र कुटुंबात राहत होते. 27 मे रोजी मनीषा हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तिच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार पती लखन राऊतराव यांच्यासह सासू- सासरे आणि दिरावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये दोघांना अटक करण्यात आली होती तर पती लखनचा शोध सुरू होता.

दरम्यान, गावातीलच विजयकुमार छपरे याला चौकशीकरता रेणापूर पोलीस ठाण्यात आणले होते. मात्र, लघुशंकेचा बहाणा करुन विजय ठाण्याच्या बाहेर आला. त्यानंतर थेट घरी जाऊन त्यानेही आत्महत्या केली. त्यामुळे या दोन्ही आत्महत्या आणि बेपत्ता असलेला लखन राऊतराव याचा काही संबंध तर नाहीना त्या अनुषंगाने शोध सुरू केला असता लखनचा मृतदेह गावाजवळच्या कोरड्या विहिरीत आढळून आला. एका पोत्यामध्ये हात-पाय बांधलेल्या अवस्थेत हा मृतदेह होता. त्यामुळे अनैतिक संबंधास अडथळा होत असलेल्या लखनचा काटा पत्नी मनीषा आणि विजयकुमार छपरे यांनी काढला आणि त्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. या घटनेने बैचेन असलेल्या मानिषाने गळफास घेऊन आत्महत्या केली तर हा सर्व प्रकार अंगलट येणार म्हणून विजय छपरे यानेही आत्महत्या केली आहे. यासंबंधी लखनचे मामा यांच्या फिर्यादीवरून रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिवाय मनीषा आणि विजयला आणखीन कुणी मदत केली का याचा शोध सुरू असल्याचे माहिती रेणापुर पोलिस ठाण्याचे पी आय गोरख दिवे यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला मालकाने अन् पोराने जागीच संपवलं, हिंगोलीत हादरलं, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचे ट्विट
पेट्रोल पंपाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्याला मालकाने अन् पोराने जागीच संपवलं, हिंगोलीत हादरलं, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचे ट्विट
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
अंगात भूत आल्याचं सांगत शाळकरी मुलीवर अत्याचार; फलटणमधील धक्कादायक घटना, आरोपी गजाआड
विलास घुले प्रकरणात नवा ट्विस्ट! आरोपी मंगेश कदमला रुग्णालयात बेदम मारहाण; CCTV व्हिडिओ समोर येताच पत्नी थेट पोलीस अधीक्षकांकडे
विलास घुले प्रकरणात नवा ट्विस्ट! आरोपी मंगेश कदमला रुग्णालयात बेदम मारहाण; CCTV व्हिडिओ समोर येताच पत्नी थेट पोलीस अधीक्षकांकडे

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Embed widget