वाशिम : गमती-गमतीमधील घटना कधी एखाद्याच्या जीवावर बेतू शकतील, याचा काही नेम नाही. चेष्ठा, मस्करीत एखाद्याचा अपमान केल्यास तो जिव्हारी लागून वाईट घटना घडते, अगदी तशीच घटना वाशिम (Washim) जिल्ह्यातील मनोरा तालुक्यात घडली आहे. या घटनेत 75 वर्षीय वृद्धा आजोबांनी आपले जीवन संपवले. या घटनेनं गावात शोककळा पसरली असून पोलिसांनी (Police) चौघांना अटकही केली आहे. मात्र, चेष्टा मस्करी करताना एखाद्याच्या जिव्हारी लागेल, किंवा एवढं अपमानित होईल, असे कृत्य कोणीही करु नये हाच धडा यातून घ्यायला हवा.

  


वाशिम जिल्ह्याच्या मनोरा तालुक्यातील तळप बु. येथील 75 वर्षीय भास्कर राठोड यांच्याशी  4 जणांनी भांडण करत त्यांना अपमानित केले होते. वयोवृद्धा आजोबांना या तरुणांनी गावातील  चौकात  मारहाण केली आणि अंगावर परिधान केलेले धोतर सोडून अपमानित केले. गावाती भरचौकात आपल असा अपमान झाल्याने चौघांनी एकत्र येत केलेली चेष्टा आजोबांच्या जिव्हारी लागली. या घटनेतून मानसिक धक्का बसल्याने भास्क राठोड यांनी यांनी विष प्राशन करुन आयुष्य संपवले. 


भास्कर यांनी विष प्राशन केल्यानंतर त्यांना प्राथमिक उपचार करुन अकोला येथे उपचारासाठी पाठविण्यात आले होते. अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असताना 7 मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे, आजोबांच्या कुटुंबातील सदस्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या आरोपीविरुद्ध मानोरा  पोलिस स्टेशनला  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपी मीराबाई सीताराम राठोड, विकास सीताराम राठोड, अमर सीताराम राठोड, उज्ज्वला सीताराम राठोड यांच्याविरुद्ध कलम 306, 329, 506, 594, 34 भा.दं. वि.नुसार गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास मानोरा पोलिस करीत आहेत.


हेही वाचा


EVM माझ्या बापाची, फेसबुक लाईव्ह करत भाजप नेत्याच्या मुलाकडून बोगस मतदान; दोघांना ठोकल्या बेड्या