Actress Who Become Monk: अनेक अभिनेते-अभिनेत्री चित्रपटसृष्टी सोडून अध्यात्माचा मार्ग निवडतात. यशस्वी झाल्यानंतरही हे सेलिब्रिटी अभिनयाचे क्षेत्र सोडतात. या यादीत साकिब खान, सना खान, जायरा वसीम, अनु अग्रवाल यांसारख्या अनेक कलाकारांचा समावेश आहे. अशाच एका टीव्ही मालिकेतील अभिनेत्रीने 27 वर्ष काम केल्यानंतर संन्यासी झाली आहे. 


या अभिनेत्रीने आपल्या 27 वर्षांच्या कारकिर्दीत 157 पेक्षा अधिक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यानंतर मात्र अचानकपणे या अभिनेत्रीने ग्लॅमरस जगताला रामराम केला. ही अभिनेत्री म्हणजे नुपूर अंलकार आहे. 


मॉडेलिंगपासून केली सुरुवात...


नुपूरने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही  मॉडेलिंगचे प्रोजेक्ट केले. त्यानंतर काही ब्रँड्स साठी जाहिराती करण्याची संधी तिला मिळाली. त्याचा फायदा अभिनयातील चांगला झाला. नुपूरने आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. त्यामुळे ती एक प्रसिद्ध अभिनेत्री झाली. नुपूरने अगले जन्म मोहे बिटीया ही कीजो, भाग रे मन, घर की लक्ष्मी,  ये प्यार ना होगा कम यासारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. 


अभिनय क्षेत्राला केला रामराम






नुपूरने 2022 मध्ये मनोरंजन क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी या निर्णयाबाबत सांगितल्यावर लोकांना धक्काच बसला. इंडस्ट्रीतून निवृत्ती घेतल्यानंतर ती आपला आध्यात्मिक प्रवास सुरू करणार असल्याचे नुपूरने सांगितले. 






नवऱ्यापासून झाली वेगळी


नुपूरने 2002 मध्ये अलंकार श्रीवास्तवसोबत लग्न केले. पती आणि सासूच्या संमतीनेच तिने फिल्मी दुनियेतून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. तिने सांगितले होते की ती तिच्या पतीपासून वेगळी झाली आहे पण दोघांनीही वेगळे होण्यासाठी कायदेशीर पर्याय न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. नुपूर अनेकदा तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. ज्यामध्ये ती एखाद्या साधूसारखे  कपडे परिधान करते. तिच्या कपाळावर चंदन लावलेले दिसते. 


 इतर संबंधित बातम्या :