एक्स्प्लोर

Ashok Kharat: अशोक खरातच्या जाळ्यात अनेक बडे मासे, SIT च्या हेल्पलाईनवर तक्रारींचा ओघ, कुणाकुणाला लुटलं, धक्कादायक माहिती समोर

Ashok Kharat: खरातने केवळ महिलांचे शोषणच केले नाही, तर राजकीय नेते आणि सेलिब्रिटींनाही कोट्यवधी रुपयांना लुटल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर आली आहे.

नाशिक: अघोरी पूजा आणि महिलांच्या शोषणाने महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाची व्याप्ती आता अधिकच वाढत चालली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या 'एसआयटी'ने (SIT) जाहीर केलेल्या हेल्पलाईनवर अवघ्या काही दिवसांत तक्रारींचा पाऊस पडला असून, खरातने केवळ महिलांचे शोषणच केले नाही, तर राजकीय नेते आणि सेलिब्रिटींनाही कोट्यवधी रुपयांना लुटल्याची माहिती सूत्रांच्या माध्यमातून समोर आली आहे. (Nashik Crime News)

हेल्पलाईनवर १०० हून अधिक फोन कॉल्स

SIT ने खरात विरोधात माहिती देण्यासाठी दोन हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १०० हून अधिक फोन कॉल्स या क्रमांकावर आले आहेत. यात प्रामुख्याने नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर (अहमदनगर) भागातील नागरिकांचा समावेश आहे. अनेक महिलांनी फोन करून खरातने केलेल्या अत्याचाराची आणि फसवणुकीची माहिती पोलिसांना दिली आहे.(Nashik Crime News)

५० रुपयांचे खडे विकले लाखांना!

तक्रारदारांनी दिलेल्या माहितीनुसार, खरातने 'रत्न' आणि 'मौल्यवान खडे' देण्याच्या नावाखाली लोकांची मोठी आर्थिक फसवणूक केली आहे. बाजारात जेमतेम ५० रुपये किंमत असलेले दगड आणि खडे तो 'चमत्कारी' असल्याचे सांगून १ लाख ते २ लाख रुपयांना विकत असे. अशा प्रकारे त्याने शेकडो लोकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.

राजकीय नेते आणि सेलिब्रिटीही जाळ्यात

धक्कादायक बाब म्हणजे, खरातच्या जाळ्यात केवळ सामान्य नागरिकच नाहीत, तर नाशिक आणि आसपासच्या जिल्ह्यातील अनेक बडे राजकीय नेते आणि सेलिब्रिटी अडकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजकीय प्रगती आणि भविष्यातील संकटे टाळण्यासाठी अनेक नेते खरातकडे जात असत. भविष्याच्या नावाखाली खरातने या बड्या व्यक्तींकडूनही मोठी रक्कम उकळली आहे. काही सेलिब्रिटींना त्याने विधींच्या नावाखाली लुबाडल्याचे बोलले जात आहे.

महिलांच्या तक्रारींमुळे खरातच्या अडचणी वाढल्या

केवळ आर्थिक फसवणूकच नाही, तर अनेक महिलांनी हेल्पलाईनवर संपर्क साधून खरातने केलेल्या शारीरिक शोषणाबाबत तक्रारी केल्या आहेत. अघोरी पूजा आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली त्याने महिलांवर अत्याचार केल्याचे आता स्पष्ट होत आहे. या तक्रारींच्या आधारे पोलीस आता अधिक ठोस पुरावे गोळा करत आहेत.

भोंदू बाबा अशोक खरातबाबत आणखी एक खुलासा

अपघात आणि अर्धांग वायूच्या झटक्यांन खरात बेजार झाला होता. दीड वर्षांपूर्वी खरातला अर्धांगवायूचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. उत्तेजक (शक्तिवर्धक) औषधांच्या अतिसेवनामुळे प्रकृती बिघडल्याचा संशय निर्माण झाला आहे. शहरातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. डॉक्टर भक्ताने वेळीच उपचार करून जीव वाचवला. आजही एका हाताची हालचाल मर्यादित, भुवईत बदल दिसून येत असल्याची माहिती आहे. उत्तेजक औषध घेणं खरातच्या जीवावर बेतलं होतं. तपासातून महत्त्वाची वैद्यकीय माहिती समोर येण्याची शक्यता आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
Nandurbar Crime News: नंदुरबार हादरले! तब्बल 51 बालकांसोबत नको ते कृत्य, 22 वर्षीय तरुणाला बेड्या, चार वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार
नंदुरबार हादरले! तब्बल 51 बालकांसोबत नको ते कृत्य, 22 वर्षीय तरुणाला बेड्या, चार वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Beed FDA Raid: आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई
आकर्षक पॅकिंग, आत बनावट तेल...; बीडमध्ये तब्बल 1 कोटी 94 लाखांचा खाद्यतेलाचा साठा जप्त, 5 युनिट्स सील, तुकाराम मुंढेंच्या खात्याची मोठी कारवाई

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Embed widget