Latur Crime: लातूर जिल्ह्यातील पेठ या गावाजवळील तावरजा नदीवरील पुलाच्या बाजूला असलेल्या जागेत अल्पवयीन मुलाचा मृतदेह सापडला आहे. याची माहिती औसा पोलीस ठाण्याला कळाल्यानंतर पोलिसांचे पथक तिथे तात्काळ दाखल झालं. त्यानंतर लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याचा पथकही घटनास्थळी दाखल झालं. या मुलाची ओळख अद्याप पटली नसून पोलीस (Latur Police) तपास सुरू आहे.
मृतदेहाची अद्याप ओळख पटली नाही (Latur Crime)
तो मुलगा कोण आहे? कुठला आहे? त्याचा खून कोणी केला ? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. घटनेची माहिती कळल्यानंतर या भागामध्ये लोकाची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली. लातुर-औसा महामार्गावर असलेल्या तावरजा नदी पुलावर सात वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह पुरला असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी तपास सुरू केला. लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्य पथकाने तात्काळ श्वान पथक पाचारण केले आहे. मागील दोन दिवसात जिल्ह्यात कुठे मिसिंग दाखल आहे का याची माहिती घेतली जात आहे. मात्र अद्याप पर्यंत मृत लहान मुलगा कुठला आहे याची माहिती समोर आली नाही .
हा मृतदेह सापडल्यानंतर या ठिकाणी लोकांनी मोठी गर्दी केली. त्यामुळे महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांची कोंडी झाली. हा मृतदेह कुणी आणि का पुरला, ही हत्या, आहे की नैसर्गिक मृत्यी अशा अनेक प्रश्नांचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. या मृतदेहाबाबत अनक अफवा पसरल्या आहेत.
मोबाईल चोरीच्या संशयावरुन शाळकरी मुलाची हत्या
लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील कुमठा खु. शिवारात धक्कादायक घटना समोर आली असून, मोबाईल चोरीच्या संशयावरुन 15 वर्षीय शाळकरी मुलाची हत्या (Murder) करण्यात आली आहे. हत्या इतका निर्घृणपणे करण्यात आली आहे की, क्रूरतेची सीमाच ओलांडली आहे. मयताचा एक पाय तोडून व चेहऱ्यावरचे कातडे सोलून टाकण्यात आले आहे. संतोष गोविंद घुगे (वय 15, रा. कुमठा खु. ता. उदगीर) असे मयताचे नाव असून, ज्ञानोबा देवनाळे (वय 28 वर्ष, रा. पिंपरी ता. उदगीर) असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी शेतात सालगडी होता
मयत संतोष गोविंद घुगे नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याचा खून करण ज्ञानोबा देवनाळे याने केला आहे. घटनास्थळी पासून जवळच असलेल्या एका शेतात तो सालगडी आहे. त्यास संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही हत्या अंदाजे चार दिवसांपूर्वी करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. संशयित आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे.
ही बातमी वाचा :
- Latur Crime News : जुन्या वादातून दोन सख्ख्या चुलत भावांची हत्या; परिसरात खळबळ; लातूर जिल्ह्यातील घटना