Mental Health Tips : कम्फर्ट झोन ही अशी परिस्थिती आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती एकाच क्षेत्राखाली किंवा एकच काम करते. त्या क्षेत्रातून बाहेर येण्यासाठी किंवा नवीन काम शिकण्याची या लोकांना भीती वाटते. ती व्यक्ती नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्नही करत नाही. उदाहरणार्थ घ्यायचं झाल्यास, जर एखादी व्यक्ती एकाच कंपनीत अनेक एकाच कंपनीत वर्षानुवर्षे काम करत असेल, तर त्यांना तिथे सुरक्षित वाटू लागते. तसेच, दुसऱ्या ठिकाणी काम करताना त्यांना भीती वाटते. अशा परिस्थितीत ते स्वत:ला एका मर्यादेत ठेवतात. पण, हा कम्फर्ट झोन तुमच्या वैयक्तिक प्रोग्रेसमध्ये मोठा अडथळा आहे. म्हणून, तुम्ही स्वतःला काहीतरी नवीन शिकण्याची संधी द्यावी आणि या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणं गरजेचं आहे. सुरुवातीला तुम्हाला यात काही अडचण येऊ शकतात पण तुमच्या भविष्यासाठी हा मार्ग चांगला असतो. अशा परिस्थितीत, या टिप्स तुम्हाला कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यास मदत करू शकतात.
तुमचा कम्फर्ट झोन ओळखा
स्वतःबद्दल विचार करा. सर्वात आधी, तुमचा कम्फर्ट झोन कोणता आहे? तुम्हाला कोणते काम सर्वात सोयीचे वाटते? हे जाणून घेणं आणि ती कामे किंवा दैनंदिन दिनचर्या ओळखणं महत्त्वाचं आहे.
ध्येय निश्चित करा
तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी तुमचे ध्येय जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमचे ध्येय निश्चित करा. काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा.
भीतीचा सामना करा
कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणं हे आव्हानात्मक असू शकतं. पण, या भीतीचा सामना करणं गरजेचं आहे. तुमच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला आणि समस्येला न घाबरता सामोरे जा. यासाठी अनेक नकारात्मक विचार मनात येतील ते काढून टाका. स्वत:वर संशय न घेता स्वत:वरचा आत्मविश्वास कायम ठेवा.
छोट्या निर्णयांपासून सुरुवात करा
यासाठी सर्वात आधी छोट्या-छोट्या निर्णयांपासून सुरुवात करा. काही छोटी ध्येय निश्चित करा. जसे की, वाचन, योगासन, व्यायाम असे छोटे निर्णय घेण्याची सवय लावा. यामुळे मोठा निर्णय घेताना फारसा त्रास होणार नाही.
सकारात्मक आणि ग्रोथ माईंड सेट ठेवा
कम्फर्ट झोनमध्ये राहून तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रगती करू शकत नाही. त्यासाठी यातून बाहेर पडावे लागेल. त्यासाठी काहीतरी नवीन शिकून स्वत:चा विकास करण्याची इच्छा असली पाहिजे आणि त्या गोष्टीबद्दल उत्साही राहा.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.