Finn Allen : आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग 2024 मार्च-एप्रिलमध्ये सुरू होणार आहे. आयपीएलच्या या नव्या सीझनबद्दल प्रत्येकजण खूप उत्सुक आहे. आयपीएल 2024 चा मिनी लिलाव गेल्या 19 डिसेंबर रोजी झाला होता. ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी लिलावात सर्व विक्रम मोडीत काढले. मात्र, पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-20मध्ये किवी संघाचा स्टार आणि स्फोटक फलंदाज फिन अॅलनने खेळलेली इनिंग पाहिल्यास त्याने अशी खेळी आधी खेळली असती, तर कदाचित त्यालाही मोठी बोली लागली असती.






फिन अॅलनकडून पाकिस्तानची धुळदाण 


सध्या न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात 5 सामन्यांची T20 मालिका खेळली जात आहे. मालिकेतील तिसरा सामना आज म्हणजेच 17 जानेवारी रोजी खेळला गेला. या सामन्यात सलामीवीर फिन अॅलनने कमाल केली. त्याने केवळ 62 चेंडूंचा सामना केला आणि 220 च्या अविश्वसनीय स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना 137 धावा केल्या. त्याच्या खेळीत 4 चौकार आणि 16 षटकारांचा समावेश होता. ही खेळी पाहून सर्व आयपीएल फ्रँचायझींना पश्चाताप होत असेल. अॅलन आयपीएल 2024 च्या लिलावाचा भाग होता. त्याची मूळ किंमत फक्त 75 लाख रुपये होती. तथापि, कोणत्याही फ्रेंचायझीने त्याच्यामध्ये स्वारस्य दाखवले नाही. 






आरसीबीकडून झाला होता रिलीज


24 वर्षीय फिन अॅलन हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग होता. मात्र, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. इतकेच नाही तर RCB ने IPL 2024 च्या लिलावापूर्वी रिलीज केले होते. आता फिनचे हे रूप पाहून बंगळुरूला कुठेतरी थोडा पश्चाताप झाला असेल. फिन ऍलनने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 38 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 165 च्या जबरदस्त स्ट्राइक रेटने फलंदाजी करताना 1025 धावा केल्या त्याने 2 शतके आणि 4 अर्धशतकेही झळकवली आहेत. 






इतर महत्वाच्या बातम्या