Kurla Bus Accident : कुर्ला येथील कुर्ला एलबीएस रोडवरील मार्केटमध्ये भरधाव बस मोठ्या गर्दीत घुसल्याने भीषण अपघात (Kurla Bus Accident) झालाय. आत्तापर्यंत या घटनेत 25 जण जखमी झाल्याची माहिती आहे. तर 4 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झालाय. ब्रेक फेलमुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पोलिसांनी या बस चालकाला ताब्यात घेतले आहे. जखमी झालेल्या लोकांवर बाबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर काही जणांना सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
भाजप नेते विनोद तावडे या घटनेबाबत बोलताना म्हणाले, मुंबईतील कुर्ला येथे बेस्टच्या बसला झालेल्या अपघातात Kurla Bus Accident) अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. स्थानिक प्रशासन सर्वतोपरी मदत करण्यास तत्पर आहे. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.
आमदार महेश कुडाळकर याबाबत बोलताना म्हणाले, मी स्वत: घटनास्थळी पाहणी करण्यासाठी जात आहे. अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली आहे. रुग्णांना मदत करणे महत्त्वाचं आहे. जवळपास 30 लोकांना मार लागल्याची माहिती आहे. काही लोकांचा मृत्यू झालाय. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. महापालिकेच्या बाबा हॉस्पिटलमध्ये सर्व जखमींना दाखल करण्यात आलंय.
इतर महत्त्वाच्या बातम्या